Utkarsha Rupwate News : 'वंचित'च्या उत्कर्षा रूपवतेंचा महाविकास आघाडीसह राज अन् उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाल्या...

Utkarsha Rupwate on Reservation News : आरक्षण वाचवायचे असेल तर संविधानाच्या बाजूने, प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.
Utkarsha Rupwate
Utkarsha RupwateSarkarnama
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aaghadi News : वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी महाविकास आघाडी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढण्यात आली होती, तिचा समारोप छत्रपती संभाजीनगर येथे झाला. याप्रसंगी भाषणातून रूपवते यांनी आरक्षण वाचवायचे असेल तर संविधानाच्या बाजूने, प्रकाश आंबेडकरांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी महाविकास आघाडीवर बोलताना उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) म्हणाल्या, आरक्षण देणारेही आंबेडकर आहेत आणि वाचवणारेही आंबेडकरच आहेत. उर्वरीत राजकारणी केवळ जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करून खेळ पाहत आहेत. आरक्षणाबाबत भूमिका मांडण्यासाठी जेव्हा सरकारकडून बोलावलं गेलं तेव्हा, तुम्ही बैठकीला जात नाहीत, गप्प राहतात. मात्र तेव्हा प्रकाश आंबेडकर बैठकीस हजेरी लावतात.

Utkarsha Rupwate
Ajit Pawar : मुख्यमंत्री शिंदेंचा सांगावा! अजितदादा नाशिक दौरा सोडून तातडीने मुंबईकडे रवाना

तर मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी काही दिवसांआधी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नसल्याचं म्हटलं होतं. यावर बोलताना रुपवते यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी तर जावाई शोधच लावला आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य करणारे विद्वान सध्या आपल्या महाराष्ट्रात फिरत आहेत.

Utkarsha Rupwate
Vijay Wadettiwar : 'कुठे नेऊन ठेवलंय माझ्या महाराष्ट्राला, गहाण ठेवलाय गुजरातला' ; विजय वडेट्टीवारांचे महायुतीवर टीकास्त्र!

याशिवाय रूपवते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यावर नावाचा उल्लेख न करताना निशाणा साधल्याचे यावेळी दिसून आले. आमचे माजी मुख्यमंत्री सागंतात की ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजे, तर मोदींना जाऊन सांगा की आरक्षणाचा टक्का वाढवा. परंतु त्यांना सांगण्याआधी तुमची भूमिका स्पष्ट करा. कारण, तुम्हीही मोदींकडे जाऊनच परतलेले आहात.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com