Parbhani Loksabha Constituency : महायुती - महाआघाडी नावालाच, परभणीत स्थानिक पातळीवर अजूनही...

Mahavikas Aghadi and Mahayuti In Parbhani : आघाडीतील तीन आणि वंचित आघाडी हे पक्ष अजूनही जिल्हा पातळीवर एकत्र आलेले नाहीत.
Parbhani Loksabha Constituency : महायुती - महाआघाडी नावालाच, परभणीत 
स्थानिक पातळीवर अजूनही...
Sarkaranama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला असून राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सर्वांचे डोळे जागावाटप आणि उमेदवार यादीकडे लागले आहेत. महायुतीचा संयुक्त मेळावा होऊन महिना उलटला आहे. मात्र त्यानंतर एकत्रित येण्याऐवजी महायुतीमधील घटकपक्षांनी उमेदवारी संदर्भात स्वतंत्र दावे केल्याचे दिसत आहे.

राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष असतांना महादेव जानकर यांनी विरोधात भूमिका घेत थेट परभणीतून लढण्याची घोषणा करून टाकली. तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पण भाजपच्या नेत्यांशी जवळीक असणारे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे मात्र आपली विधानसभा कशी सुरक्षित राहील हे पाहण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. राज्य पातळीवर नेत्यांनी महायुतीचा घाट घातला असला तरी स्थानिक पातळीवर तीनही पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांची मनं अजूनही जुळलेली नाहीत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parbhani Loksabha Constituency : महायुती - महाआघाडी नावालाच, परभणीत 
स्थानिक पातळीवर अजूनही...
Parbhani Loksabha Constituency : ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव शड्डू ठोकून मैदानात, पण...

महायुतीच्या मेळाव्याला शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मारलेली दांडी बरीच बोलकी होती. अशीच काहीशी परिस्थिती महाविकास आघाडीच्या बाबतीतही दिसते. महायुतीने किमान एक संयुक्त मेळावा तरी घेतला, आघाडीतील तीन आणि वंचित आघाडी हे पक्ष अजूनही जिल्हा पातळीवर एकत्र आलेले नाहीत. लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली असतांना असे चित्र असेल तर मग पुढे काय? असा प्रश्न महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना पडणे सहाजिक आहे.

महायुतीचा संयुक्त मेळावा होऊन महिना उलटला पण त्यानंतर हे पक्ष व त्यांचे नेते पुन्हा एकत्र दिसले नाही. आमदार गुट्टे, शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांची महायुतीच्या मेळाव्यापासून लांब राहणे पसंत केले? नेमकी त्यांची नाराजी काय? ती दूर झाली नाही, तर याचा फटकाही महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो. सईद खान व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांच्यात राजकीय मतभेद आहेत. मग महायुती असली तरी ही दोन विरुद्ध दिशेला असलेली तोंड एका दिशेला कशी येणार? अशा अनेक अडचणी महायुतीला स्थानिक पातळीवर आहेत.

Parbhani Loksabha Constituency : महायुती - महाआघाडी नावालाच, परभणीत 
स्थानिक पातळीवर अजूनही...
Shivsena UBT : उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात चंद्रकांत खैरेंची उमेदवारी फिक्स ?

काही दिवसापूर्वीच सईद खान यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीबद्दल दावा केला. भाजपकडूनही असा दावा गेल्या अनेक महिन्यांपासून केला जात आहे. यात सहा महिन्यांपूर्वी सत्तेत दाखल झालेल्या अजित पवार गटानेही उडी घेतली आहे. ही सगळी परिस्थिती पाहता महायुती कागदावरच राहते की काय? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची परिस्थितीही काही वेगळी नाही. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट)अद्याप जिल्हापातळीवर एकत्रित आल्याचे दिसून येत नाही.

शिवसेना पक्ष फुटीनंतर परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत. मात्र मागील काळात पक्षातील वर्चस्ववादाच्या स्पर्धेतून या दोघांमध्येही गटबाजी झाली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या राज्यसभा सदस्या फौजिया खान या पक्षाच्या राष्ट्रीय व राज्य स्तरावर सक्रीय असतात.

Parbhani Loksabha Constituency : महायुती - महाआघाडी नावालाच, परभणीत 
स्थानिक पातळीवर अजूनही...
Santosh Bangar Controversial : आधी मिशी, फाशी अन् आता उपाशी; आमदार बांगरांची गाडी थांबेचना!

जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र स्थानिक राजकीय स्थितीमुळे त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचे ठरवले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करणाऱ्या नेत्यांची पक्षाला प्रतिक्षा आहे.

तर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपूडकर किल्ला लढवत आहेत. माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार सुरेश देशमुख हे नेते अद्याप सक्रीय झाले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी मधील सहभागी घटकपक्षामध्ये अद्यापही मनोमिलन झाले नसल्याचे दिसून येत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com