Phulambri Assembly Constituency 2024 : फुलंब्रीत भाजपने दाखवला `नारीशक्ती`वर विश्वास ; पण विरोधकांचे कडवे आव्हान

In Phulumbri Constituency, BJP gave opportunity to women for the first time : आता झाले गेले विसरून भाजपसह महायुतीतील घटक पक्षांना कामाला लावून विजय मिळवत अनुराधा चव्हाण विधानसभेत एन्ट्री करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
Phulambri Assembly Constituency News
Phulambri Assembly Constituency NewsSarkarnama
Published on
Updated on

नवनाथ इधाटे

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष, राजस्थानचे विद्यमान राज्यपाल यांनी प्रतिनिधित्व केलेल्या विधानसभेच्या फुलंब्री मतदारसंघात भाजपने अखेर `नारीशक्ती`वर विश्वास दाखवला. डझनभर इच्छुकांशी स्पर्धा करून अनुराधा चव्हाण यांनी अखेर उमेदवारी पटकावलीच. उमेदवारी मिळाली असली तरी त्यांना विरोधकांचे कडवे आव्हान असणार आहे. विरोधकांचे डाव उलटवून लावतांनाच मित्र पक्षाकडून सुरु असलेल्या बंडखोरीचा अनुराधा चव्हाण कसा सामना करणार? यावर हरिभाऊ बागडे यांनी राखलेली विजयाची परंपरा अनुराधा चव्हाण पुढे चालवतात का? हे ठरणार आहे.

बागडेनाना यांच्याबद्दल असलेल्या आदरामुळे अनुराधा चव्हाण यांनी 2019 मध्ये माघार घेतली होती. 2024 मध्ये त्यांना याचे फळ उमेदवारीच्या रुपात मिळाले आहे. (BJP) भाजपमध्ये शिफारशीवर उमेदवारी मिळत नाही, तर सर्व्हेत ज्याचे नाव आघाडीवर असते पक्ष त्यालाच संधी देतो, असे सांगत हरीभाऊ बागडेनाना यांनी आपली सुटका करून घेतली होती. बंद लिफाफ्यातील पसंतीनूसार अनुराधा चव्हाण यांनी पक्षातील इच्छुकांना मागे टाकत उमेदवारी पटकावली.

आता झाले गेले विसरून भाजपसह महायुतीतील घटक पक्षांना कामाला लावून विजय मिळवत अनुराधा चव्हाण विधानसभेत एन्ट्री करतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2009 मध्ये काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर मात्र सलग दोन निवडणुकीत भाजपच्या हरिभाऊ बागडे यांनी हा मतदारसंघ राखला. आता भाजपने अनुराधा चव्हाण यांच्या रुपाने मतदारसंघात पहिल्यांदा महिलेला संधी दिली आहे. पहिला विजय मिळवून अनुराधा चव्हाण विधानसभेत पाऊल ठेवण्यात यशस्वी होतात का? याकडे आता सगळ्याचे लक्ष असणार आहे.

Phulambri Assembly Constituency News
BJP Candidates List : भाजपच्या पहिल्या यादीत इतक्या महिला उमेदवारांना संधी; चार नवे चेहरे

गेल्या दहा वर्षापासून फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अनुराधा चव्हाण कार्यरत आहेत. पक्षांतर्गत सर्व्हेमध्ये त्यांनी राधाकिसन पठाडे, सुहास शिरसाट, राजेंद्र साबळे, प्रदीप पाटील, किशोर शितोळे, रामू काका शेळके, विजय अवताडे यांच्यावर मात केली. (Haribhau Bagde) आता या इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, पण महामहीम राज्यपाल बागडेनाना या नाराजांना कामाला लावतील, असे बोलले जाते. दुसरीकडे महायुतीतील शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपले कट्टर समर्थक किशोर बलांडे आणि खासदार संदिपान भुमरेंचे विश्वासू म्हणून ओळख असलेले रमेश पवार हे अपक्ष निवडणुक लढण्याची तयारीत आहेत. त्यामुळे आता महायुतीतील या बंडोबांना शांत करताना महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

बागडेंनी राजकीय वारस निवडला?

हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी निवड झाल्यानंतर फुलंब्री विधानसभा मतदारसंघात त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार? याची चर्चा सुरू झाली होती. गेल्या दहा वर्षात बागडेनाना यांनी मतदारसंघात अनेक नवे, तरुण नेतृत्व उभे केले. सगळ्यांना समान वागणूक देत बागडेंनी मी नानांच्या फार जवळचा आहे, असे म्हणण्याची संधी दिली नाही. राज्यपाल पदी निवड झाल्यानंतर बागडे यांनी राजस्थानमध्ये जाऊन पदभार स्वीकारला त्या दिवसापासून या मतदारसंघातून लढण्यास इच्छूक असणाऱ्यांनी लाॅबिंग करायला सुरवात केली होती.

Phulambri Assembly Constituency News
Governoer Haribhau Bagde : `माझा तिहेरी सत्कार` हरिभाऊ बागडेंनी इच्छुकांना काढला चिमटा..

पक्षाचा सर्व्हे, बंद पाकीटात नावे देण्याचा प्रयोग या सगळ्या गोष्टी झाल्या असल्या तरी फुंलब्रीत आपला राजकीय वारस कोण असावा? याबद्दल बागडेनाना यांनी आपले मत व्यक्त केले नसले? यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. बागडे यांना विचारल्याशिवाय फुलंब्रीतील उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणे शक्य नाही, हे स्पष्ट होते. आज भाजपची पहिली यादी जाहीर झाली तेव्हा मराठवाड्यात ज्या दोन नव्या चेहऱ्यांना पक्षाने संधी दिली त्यात अनुराधा चव्हाण यांचे नाव होते. उमेदवारी मिळाली, आता विजय मिळवत चव्हाण खऱ्या अर्थाने बागडे यांचा राजकीय वारसा पुढे चालवतात का? हे 23 नोव्हेंबरच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com