BJP Candidates List : भाजपच्या पहिल्या यादीत इतक्या महिला उमेदवारांना संधी; चार नवे चेहरे

Assembly Election News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.
Vidya Thakur, meghna bordikar, manda mahatre, shweta mahale, madhuri misal
Vidya Thakur, meghna bordikar, manda mahatre, shweta mahale, madhuri misal Sarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2024 News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी भाजपने 99 जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्राचे भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे. त्या सोबतच या यादीत भाजपने (Bjp) 13 महिलांना संधी दिली आहे.

यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुलीला संधी दिली आहे. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. (BJP Candidates List)

त्याशिवाय बेलापूर मतदारसंघातून बेलापूर मंदा म्हात्रे, चिखली श्वेता महाले, श्रीगोंदामध्ये प्रतिमा पाचपुते, पर्वतीमधून माधुरी मिसाळ (Madhuri Misal), जिंतूर मेघना बोर्डीकर, गोरेगाव विद्या ठाकूर, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, दहिसर मनीषा चौधरी, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड, नाशिक पश्चिम सीमा हिरे, फुलंब्री अनुराधा चव्हाण यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

यामधील नऊ महिला या विद्यमान आमदार आहेत तर चार महिलांना पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामध्ये श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून तर कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड, फुलंब्री अनुराधा चव्हाण, श्रीगोंदामध्ये प्रतिमा पाचपुते यांना प्रथमच संधी देण्यात आली आहे.

Vidya Thakur, meghna bordikar, manda mahatre, shweta mahale, madhuri misal
Ajit Pawar Politics: नाशिकमध्ये अजित पवारच महायुतीत मोठा भाऊ, ७ उमेदवार निश्चित!

भाजपच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी अखेर रविवारी जाहीर झाली. मराठवाड्यातील 16 विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा यात करण्यात आली असून फक्त भोकर आणि फुलंब्री या दोन मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर उर्वरित 14 विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदारांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहे. त्यामुळे मराठवाड्यात फारसे बदल दिसत नाहीत.

Vidya Thakur, meghna bordikar, manda mahatre, shweta mahale, madhuri misal
MVA News : शरद पवार गटाचा आकडा ठरला; ठाकरे गटाचे इतके उमेदवार फायनल तर काँग्रेसच काय ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com