Umarga Market Committee Election News
Umarga Market Committee Election NewsSarkarnama

Umarga Market Committee : विरोधकांचे `कुठे कमी तिथे आम्ही`, धोरण कुणाच्या पथ्यावर ?

Mahavikas Aghadi : गत निवडणुकीत सहकारी सेवा संस्थेच्या मतदारसंघात क्रॉस व्होटींग झाली होती.
Published on

Marathwada : उमरगा, मुरूम बाजार समितीच्या (Umarga Market Committee) निवडणूकीतील रंगत वाढत चालली आहे. मतदान दोन दिवसावर आल्याने महाविकास आघाडी व भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर अधिक जोर दिला आहे. दरम्यान उमरगा बाजार समितीत क्रॉस व्होटींग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदार संख्या कमी असली तरी यादीतील मतदारांच्या प्रत्यक्षात भेटीसाठी उमेदवारांची दमछाक होत आहे.

Umarga Market Committee Election News
Parbhani Market Committee : आघाडीचे सत्ता वाटप ठरले, सभापती पद शिवसेनेकडे, तर उपसभापती काॅंग्रेसचा..

राज्यात महाविकास आघाडीत (Mahavikas Agahadi) बिघाड होत असल्याच्या वृत्ताने संभ्रम असला तरी उमरगा, मुरुम बाजार समितीच्या निवडणूकीत मात्र महाविकास आघाडीची सध्यस्थिती तरी वज्रमूठ दिसत आहे. (Osmanabad) येथील लोकप्रतिनिधी शिंदे गटात गेल्यानंतरची स्थानिक स्वराज्य संस्थेची ही पहिलीच निवडणूक आहे.

विशेषतः महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार वेगळ्या अर्थाने भावनिक प्रचार आणि चरण स्पर्श करत मतदारांना साद घालत आहेत. (Marathwada) काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार मतदारांची प्रत्यक्ष भेट घेत आहेत. (APMC Election) उमरगा बाजार समितीच्या गत निवडणुकीत सहकारी सेवा संस्थेच्या मतदारसंघात क्रॉस व्होटींग झाली होती. दोन्ही आघाडीला समान जागा मिळाल्या होत्या.

या निवडणुकीतही तशीच शक्यता नाकारता येत नाही. सहकारी सेवा संस्थेच्या अकरा जागा या बहुमताचा टप्पा गाठण्याची किमया करणाऱ्या आहेत. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्राबल्य असल्याने विरोधकाकडून क्रॉस व्होटिंगची चाचपणी सुरु आहे. `कुठे कमी, तेथे आम्ही` हे धोरण अवलंबले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे मतदार प्रामाणिक रहातात का? हे पहावे लागेल.

मुरुम बाजार समितीच्या निवडणूकीतील मतदार विशेषतः कॉंग्रेस पक्षाला मानणारे आहेत, शिवाय त्यांच्या सोबत राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गट असल्याने महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. माजी मंत्री बसवराज पाटील, बाजार समितीचे माजी सभापती बापूराव पाटील यांच्या नियोजनाने सर्वाधिक जागा येतील असा दावा केला जातोय. मात्र महाविकास आघाडीला छेद देण्यासाठी भाजप -शिवसेनेचे नियोजन सुरु असून दोन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com