Aurangabad : एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत बॅंकेच्या कर्जवितरण कार्यक्रमाला भुमरे, दानवेंची दांडी

खैरे यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख करत त्यांना दुःख झाले असेल असा टोला देखील लगावला. (Shivsena)
Minister Eknath Shinde
Minister Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर पाच हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांना प्रत्येक १ लाखांचे वैयक्तिक कर्ज देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. (Aurangabad) त्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आमंत्रित केले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर कर्जवितरण सोहळा पार पडला. परंतु शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या बॅंकेचे विद्यमान संचालक तथा राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार अंबादास दानवे यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती. विशेष म्हणजे तेव्हा शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे यांना संपुर्ण निवडणुक प्रक्रियेतूनच डावलण्यात आले होते. (Marathwada) परंतु उपाध्यक्षपदावरून सत्तार-भुमरे-दानवे यांच्यात वाद झाला. अध्यक्ष व उपाध्यक्ष अशी दोन्ही महत्वाची पद म्हणजेच बॅंकेची सगळी सूत्र सत्तार यांनी आपल्या ताब्यात ठेवली.

त्यानंतर पुन्हा सत्तार-भुमरे-दानवे यांच्या दिलजमाई झाली होती. परंतु जिल्हा दुध उत्पादस संघाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दानवे-भुमरे-काळे-बागडे यांनी संगनमाताने सत्तार समर्थक उमेदवाराचा पराभव केला आणि पुन्हा या तिघांमध्ये वादाची थिनगी पडली. आता हा वाद विकोपाला गेल्याचे चित्र आजच्या कर्ज वितरण कार्यक्रमात देखील पहायला मिळाले.

Minister Eknath Shinde
Aimim : इतकी वर्ष पाणी न देता वसुल केलेली कोट्यावधीची पाणीपट्टी व्याजासह परत करा..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल मुंबईत जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी राज्यभरातील शिवसेनेचे खासदार, आमदार लोकप्रतिनिधी मुंबईत गेले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंह राजपुत हे देखील या सभेला उपस्थितीत होते. परंतु काल सभा पार पडल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचा आपला नियोजित दौरा पुर्ण केला.

खैरे, राजपूत हे देखील जिल्हा बॅंकेच्या कार्यक्रमासाठी आवर्जून आले. परंतु बॅंकेचे संचालक असलेले संदीपान भुमरे, अंबादास दानवे यांनी मात्र कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. खैरे यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख करत त्यांना दुःख झाले असेल असा टोला देखील लगावला. यावरून शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरी अद्यापही सुरूच असल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com