Chandrakant Khaire News : 'महायुतीत मारामाऱ्या, संभाजीनगरात मशालच पेटणार' ; चंद्रकांत खैरेंचा दावा!

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : आमच्या समोर कोणीही येऊ द्या, काही फरक पडणार नाही, असंही खैरे म्हणाले आहेत.
Chandrakant Khaire News
Chandrakant Khaire NewsSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे इथून विजयाची मशालच पेटणार, असा दावा शिवसेना नेते व ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीतल्या शिंदेसेना आणि भाजपमध्ये मारामाऱ्या सुरू आहेत. संदीपान भुमरेंनी तिकडून जोर लावला आहे, पण आमच्या समोर कोणीही येऊ द्या, काही फरक पडणार नाही, असा आत्मविश्वासही खैरे यांनी व्यक्त केला.

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुती-महाविकास आघाडी आणि एमआयएम अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील वगळता महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीची तयारी सुरू केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दौरेही सुरू झाले आहेत. दुसरीकडे एमआयएमने दुसऱ्या विजयाचा दावा करत भेटीगाठीवर भर दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chandrakant Khaire News
Shivsena UBT News : खैरे-दानवेंचे तुणतुणे सुरूच; म्हणे दोघेही इच्छुक..

असदुद्दीन ओवैसी हे नुकतेच शहरात येऊन गेले. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमचे इम्तियाज जलील पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, असा दावा केला. ठाकरे गटात उमेदवारीवरून कुठलेही वाद नाहीत, महिला आघाडींना उद्धव ठाकरे न भेटल्यामुळे त्या नाराज आहेत, यातही तथ्य नाही. पक्षात एक शिस्त असली पाहिजे. नेत्यांनी बोलावले तर यावे, अन्यथा येऊ नये. आम्हीही बोलावले तरच जातो नाही तर जात नाही, असे स्पष्टीकरण खैरे(Chandrakant Khaire) यांनी दिले.

राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली, यावर खैरे यांनी ` अरे बाबा, मी त्या विषयावर काही बोलणार नाही` म्हणत बगल दिली. संजय राऊत यांनी औरंगजेब गुजरातमध्ये जन्मला, अशी टीका केली होती, यावरही खैरे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. संजय राऊत आमचे नेते आहेत, त्यांच्या विधानावर मी काही बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Khaire News
Abdul Sattar News : संभाजीनगर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचा दावा करणारे मंत्री सत्तार आहेत कुठे ?

संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये रोज मारामाऱ्या सुरू आहेत. संदीपान भुमरे यांनी लढण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून कराड, सावे यांची नावे समोर येत आहेत, पण आधी त्यांच्यातली भांडण मिटू द्या. आमच्यासमोर कोणीही आले, तर फरक पडणार नाही. संभाजीनगरात शिवसेनेचाच विजय होणार आणि आमची मशाल पेटणार, याचा पुनरुच्चारही खैरे यांनी केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com