Waqf Board Recruitment News : वक्फ बोर्डाची ६० पदासांठी जाहीरात, अट मात्र उमेदवार मुस्लीम असावा; विरोधात याचिका..

Waqf Board Recruitment Advertise News Of Maharashtra : औरंगाबाद खंडपीठाने बजावली नोटीस महिन्याभरात उत्तर देण्याचे आदेश..
Waqf Bord Recruitment News
Waqf Bord Recruitment News Sarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : महाराष्ट्र वक्फ बोर्डाने (Waqf Board) विविध ६० पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या पदासांठी उमेदवार मुस्लिम धर्मीयच असावेत, अशी अट बोर्डाने टाकली आहे. बोर्डाच्या या अटीला आव्हान देणारी याचिका दाखल झाल्यानंतर आता औरंगाबाद खंडपीठाने केंद्र सरकार, राज्य सरकारसह वक्फ बोर्डाला नोटीस बजाववली आहे. या नोटिशीला २९ सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. (Latest Marathi News)

Waqf Bord Recruitment News
Jalna Maratha Andolan : लोकशाहीचा 'जालियानवाला बाग ते जालना' प्रवास; राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल

वक्फ बोर्डाने घातलेली अशी अट राज्यघटनेच्या कलम १५ नुसार घालता येत नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केली आहे. धुळे येथील वकील अमरसिंह सिसोदिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. सिसोदिया हे जाहीरातीमधील विधी साहाय्यक पदासाठीचे उमेदवार आहेत. परंतु वक्फ बोर्डाच्या अटीमुळे केवळ मुस्लिम धर्मीय यासाठी अर्ज करू शकतात, यामुळे हे राज्यघटनेतील कलम १५ चे उल्लंघन असल्याचे सिसोदियांचे म्हणणे आहे.

Waqf Bord Recruitment News
Beed News : बीडच्या भुमिपुत्राकडूनच मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर ; जरांगे यांच्यामुळे अंतरवालीची देशात ओळख

वक्फ बोर्डाने ४ ऑगस्ट रोजी ही जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या जाहीरातीमधून उमेदवार मुस्लीमच असावा ही अट काढून टाकण्याची मागणी सिसोदिया यांनी याचिकेमधून केली आहे. यामुळे आता वक्फ बोर्ड आता ही अट काढणार का? की न्यायालयीन लढाईतून यातून तोडगा निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com