Maratha Reservation News : आधी मराठा आरक्षण, मग पक्ष ; नांदेडमध्ये भाजप पदाधिकारी आक्रमक..

Marathwada Political News : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded BJP Political News : मराठवाड्यात मराठा आरक्षणाची धग दिवसेंदिवस वाढतच आहे. याच मागणीसाठी गेल्या तीन दिवसात तीन तरुणांनी आपले जीवन संपवले. सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मार्गांनी आंदोलनही सुरू आहे. (BJP News) मराठा आरक्षणाच्या मागणीवरून तरूण आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाचा मोठा फटका राजकीय पक्षांना बसत आहे. आमदार, खासदारांना गावबंदी, शासकीय कार्यक्रम बंद पाडणे, आरक्षणासाठी काय कले? असा जाब विचारणे, मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आदी मार्गांनी मराठा तरुण आपला संताप व्यक्त करत आहेत.

Maratha Reservation News
Manoj Jagange Patil PC News : आता आमच्या गावात मंत्री, खासदार, आमदारांनी यायचंच नाही...

याची धास्ती घेऊन काही पक्षांनी आपल्या बैठका, अभियान स्थगित केले आहेत. सध्या `एकच मिशन मराठा आरक्षण` हे अभियान सुरू आहे. (Maratha Reservation) सत्ताधारी भाजपमध्ये मराठा नेते, पदाधिकारी, तरुण मोठ्या संख्येने आहेत. त्यांनीही आता आक्रमक भूमिका घेत `आधी आरक्षण, मगच पक्ष`, अशी भूमिका घेत चक्क निवडणूक तयारीच्या बैठकीवरच बहिष्कार टाकल्याचा प्रकार नांदेड (Nanded) जिल्ह्यात समोर आला आहे.

हे लोण हळूहळू इतर पक्षात पसरायला वेळ लागणार नाही, असे चित्र आहे. मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून तातडीने आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी विविध मार्गांनी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. (Marathwada) मराठा समाजाच्या आरक्षण बाबत तरुणांच्या तीव्र भावना आहेत. या मागणीसाठी स्वपक्षातील नेत्यांनाही जाब विचारला जात आहे. हादगाव (जि नांदेड) येथे एका मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीला भाजपाचे मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हाक्काचे, एक मराठा लाख मराठा आशा घोषणा देत बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपकडून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू असुन हिंगोली मतदार संघातील हादगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते, संघटन प्रमुख व काही पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर मराठा पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही पक्षाचे कोणतेही काम करणार नाही. आधी आरक्षण नंतर पक्ष, अशी आक्रमक भूमिका तरुणांनी घेतली आणि बैठकीतून निघून गेले. या अचानक झालेल्या घटनेमुळे उपस्थित‌ वरिष्ठ पदाधिकारी अवाक झाले.

Maratha Reservation News
Manoj Jarange Patil Speech : 'सरकारला आंदोलन धुळीत मिसळायचंय, पण मी खानदानी मराठा..' ; जरांगे इरेला पेटले!

नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून लोकप्रतिनिधींना तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातुन कोणातच पक्ष सुटला नाही. नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना काळें झेंडा दाखविण्यात आले होते तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धर्माबाद शहरात तरुणांनी आरक्षणसाठी जाब विचारला होता. आमदार श्यामसुंदर शिंदे यांनाही तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. गिरगाव (जिल्हा हिंगोली) येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com