Congress Committee News : देशात विविध जाती, समाजाच्या आरक्षणाचा विषय व त्यावरून आंदोलने नेहमीच होत असतात. विशेषतः मराठवाड्यात सध्या मराठा, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजतोय. (Maratha Reservation) यावरून राज्यात मराठा ओबीसी असा संघर्ष भडकण्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यसमितीच्या हैद्राबाद येथील दोनदिवसीय बैठकीत सामाजिक आरक्षणांची कमाल मर्यादा वाढविण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला आहे.
काँग्रेसची (Congress) ही भूमिका मराठा आरक्षणाला पाठबळ देणारी असल्याचे मत मराठा आरक्षण उपसमितीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केले आहे. आरक्षणावरील ५० टक्के कमाल मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेस अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांनी यापूर्वीही घेतल्याचे चव्हाण म्हणाले.
ऑगस्ट २०२१ मध्ये १२७ व्या घटनादुरुस्तीवरील चर्चेत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी, प्रख्यात विधिज्ञ खासदार अभिषेक सिंघवी, संजय राऊत, सुप्रिया सुळे, विनायक राऊत, सुरेश धानोरकर वंदना चव्हाण आदी महाविकास आघाडीच्या (Maharashtra) अनेक खासदारांनी आरक्षण मर्यादा शिथिल करून मराठा आरक्षणाचा अडथळा दूर करण्याची मागणी संसदेत प्रभावीपणे केली होती.
खासदार संभाजीराजे यांनीसुद्धा मराठा आरक्षण देण्याची भूमिका राज्यसभेत घेतली होती. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा वाढविण्याबाबत काँग्रेस कार्यसमितीने आता ठराव पारित करून एकप्रकारे ही पक्षाची ठाम भूमिका असल्याचे अधोरेखित केले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील इंद्रा साहनी व अन्य निवाड्यांमधून `केस लॉ` झालेली ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा मराठा आरक्षणाच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे. या प्रमुख अडथळ्यावर काँग्रेसने अधिकृतपणे भूमिका घेतली असून, आता भाजप सरकारनेही याबाबत धोरण स्पष्ट करून विशेष अधिवेशनात आरक्षण मर्यादा वाढविण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची आवश्यकता असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.