Ashok Chavan On Reservation : तरुणांनो, आयुष्य संपवून नाही, जनमताचा दबाव वाढवून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल...

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी राजकीय व कायदेशीर पातळीवर लढा द्यावा लागणार आहे.
Ashok Chavan On Maratha Reservation News
Ashok Chavan On Maratha Reservation NewsSarkarnama

Nanded Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात तीव्र आंदोलने सुरू आहेत. (Maratha Reservation) मराठा समाजाच्या काही तरुणांनी तर टोकाचे पाऊल उचलत आरक्षणाच्या मागणीसाठी आपले आयुष्य संपवून टाकले. नांदेड जिल्ह्यातील सुदर्शन देवराये नावाच्या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.

Ashok Chavan On Maratha Reservation News
Jalna NCP Politics : शरद पवारांनी अभय दिलेल्या सुरेखा लहानेंचे नगराध्यक्षपद अजितदादा सत्तेत येताच गेले..

हे दुःखदायक आहे, पण मराठा आरक्षणाचा प्रश्न आयुष्य संपवून नाही, तर सरकारवर जनमताचा दबाव वाढवून सुटणार आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केले आहे. अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षणाच्या सतरा दिवसांच्या उपोषणानंतर या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यात पोहाेचली. (Nanded) अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू आहेत.

कामारी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथील सुदर्शन देवराये नामक युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. (Marathwada) यावर अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त करत तरुणांना टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आहे. देवराये कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. शासनाने या घटनेची तातडीने दखल घ्यावी,

मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी राजकीय व कायदेशीर पातळीवर लढा द्यावा लागणार आहे. मात्र, समाजातील सर्व तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे की, कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका. हा प्रश्न आयुष्य संपवून नव्हे तर शासनावर जनमताचा दबाव निर्माण करूनच सुटणार आहे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com