Jitendra Awhad News : सावध रहा, संविधान बदलण्याचा भाजपचा डाव!

Beware BJP`s plan to change the nation`s constitution-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत भारतीय जनता पक्षाच्या राजकारणावर नेत्यांनी टिका केली.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon NCP News : भारतीय जनता पक्षाने गेल्या नऊ वर्षात जे काम केले आहे, त्याने जनता वैतागली आहे. हा पक्ष फक्त मुठभर लोकांसाठी काम करतो. देशाच्या घटनेवर त्यांचा विश्वास नसल्याने ते राज्यघटना बदलण्याच्या विचारात आहेत, त्याबाबत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. (NCP leaders criticized bjp on there political policy)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भारतीय जनता पक्षाने (BJP) केंद्रात सत्तेवर आल्यापासून लोकशाहीला हरताळ फासला आहे. संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून ते विरोधकांना त्रास देत आहेत.

Jitendra Awhad
Rohit Pawar News : मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नका ; रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, की ‘वन नेशन- वन इलेक्शन’ हा प्रयत्न म्हणजे अध्यक्षीय पद्धतीकडे वाटचाल करण्याचा आहे. यानुसार देशाचे संविधान बदलण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेने तो हाणून पाडला पाहिजे.

‘ईडी’च्या धाकाने आमदार गेले : देशमुख

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी पक्षबदल करण्याबाबत टीका करताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, की हे आमदार केवळ ‘ईडी’च्या धाकाने तिकडे गेले आहेत. मलाही ‘ईडी’चा धाक दाखविण्यात आला, त्या वेळी आपण कारागृहात गेलो; परंतु त्यांच्याकडे गेलो नाही.

Jitendra Awhad
NCP News : शरद पवारांचा जळगाव दौरा भाजपची कोंडी करण्यात यशस्वी ठरला?

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात बदल होईल अशी स्थिती आहे. या जिल्ह्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल, याचा विश्‍वास आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे जिल्ह्यातून रावेर लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com