BRS Rally News : तेलंगणात करून दाखवले, आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणार..

Harshvardhan Jadahav : महाराष्ट्रात देखील आम्ही राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार आहोत.
K. Chandrasekhar Rao Rally News
K. Chandrasekhar Rao Rally NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambahjinagar : मागील ७० वर्षांत काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी राज्याचा कारभार पाहिला, मात्र या काळात शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेला काय मिळाले? आजही या घटकांची अवस्था बिकटच आहे. मात्र (Bharat Rashtra Samiti) बीआरएस पक्ष त्यांच्या जीवनात खरी समृद्धी आणण्याचे काम करणार आहे. तेलंगाणामध्ये मुख्यमंत्री केसीआर यांनी ते करून दाखविले आहे. आता महाराष्ट्रातही ते शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणू पाहत आहेत, असा दावा बीआरएसच्या वतीने करण्यात येत आहे.

K. Chandrasekhar Rao Rally News
BRS Rally News : छत्रपती संभाजीनगरातील केसीआर यांच्या सभेसाठी मैदानाची पाहणी...

येत्या २४ एप्रिल रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) यांची शहरात जाहीर सभा होणार आहे. या सभेची माहिती बीआरएसचे खासदार बी.बी पाटील यांनी दिली. (Marathwada) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात (Maharashtra) आपला पक्ष वाढविण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत.

नांदेड जिल्ह्यात झालेल्या पहिल्या दोन सभांनंतर केसीआर यांनी मराठवाड्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. (Harshvardhan Jadhav) या सभेसाठी मैदानाची पाहणी करण्यासाठी बीआरएसचे खासदार बी.बी पाटील,आमदार जीवन रेड्डी, शकील आमिर, किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम आज शहरात दाखल झाले होते.

यावेळी नुकताच बीआरएसमध्ये प्रवेश केलेले अब्दुल कदिर मौलाना, अभय पाटील चिकटगावकर, प्रदीप साळुंके, वेणू गोपालचारी हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलतांना बीआरएसचे हर्षवर्धन जाधव म्हणाले, मागील ७० वर्षांत काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी राज्याचा कारभार पाहिला, मात्र या काळात शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेला काय मिळाले. आजही या घटकांची अवस्था बिकटच आहे.

मात्र बीआरएस पक्ष त्यांच्या जीवनात खरी समृद्धी आणण्याचे काम करणार आहे. केसीआर सरकारने शेतकऱ्यांसाठी दरवर्षी एकरी १० हजार रुपये अनुदान देणे सुरू केले. चोवीस तास मोफत वीज पुरवठा केला, शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे विमा कवच दिले, असे अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. केसीआर सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आम्ही राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार आहोत, असे जाधव म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com