Chhatrapati Sambhajinagar : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) यांची येत्या २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरात सभा होत आहे. या सभेत मराठवाड्यातील विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश करणार आहे. हा सोहळा भव्य दिव्य व्हावा यासाठी बीआरएसचे स्थानिक नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव, कदीर मौलाना प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, (BRS) बीआरएसचे आमदार जीवन रेड्डी यांनी पक्षाचे महाराष्ट्र राज्य निरीक्षक यांच्यासोबत सभेसाठीच्या शहरातील जागेची पाहणी केली. केसीआर (K.Chandrashekhar Rao) यांच्या सभेसाठी आमखास आणि एमजीएम मैदानाची पाहणी करण्यात आली आहे. (Marathwada) दोन्ही पैकी एका मैदानाची सभेसाठी निवड केली जाणार आहे.
तत्पुर्वी आमदार जीवन रेड्डी व त्यांच्यासोबत आलेल्या महाराष्ट्र राज्य निरीक्षकांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्यासोबत वेरूळ येथील घृष्णेश्वराचे दर्शनही घेतले. विदर्भासह मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते बीआरएसशी जोडले जात आहेत.
हैदराबाद येथील केसीआर यांच्या निवासस्थानी गेल्या काही दिवसांत माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगांवकर यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला.
तेव्हाच हर्षवर्धन जाधव यांनी केसीआर यांना छत्रपती संभाजीनगरात सभा घेण्याची गळ घातली होती. २४ एप्रिल रोजी ही सभा घेण्यास केसीआर यांचा हिरवा कंदील मिळाला होता. त्यानंतर आता सभा घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.