Jalna : अर्जूनाचा नेम चुकला, दोन दिवसांपुर्वीच मंजुरी दिलेल्या कामासाठीचे आंदोलन फसले..

नगर परिषदेवर काॅंग्रेसची पर्यायाने गोरंट्याल यांची सत्ता असल्याने त्यांना अडचणीत आणण्याचा आणि श्रेय घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता. (Jalna)
Shivsena Leader Arjun Khotkar, Jalna
Shivsena Leader Arjun Khotkar, JalnaSarkarnama

जालना : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर आणि काॅंग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांच्यातील राजकीय संघर्ष सध्या चांगलाच पेटला आहे. (Jalna) गोरंट्याल खोतकरांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तर खोतकर गोरंट्यालांना (Kailas Gorantyal) खिंडीत गाठण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. तसं पाहिलं तर हे दोघेही महाविद्यालयापासूनचे मित्र, पण पुढे राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. (Shivsena)

२०१९ च्या विधानभा निवडणुकीत खोतकर यांचा गोरंट्याल यांनी पराभव केला. त्यांना भाजपची छुपी साथ मिळाल्याची देखील तेव्हा चर्चा होती. पण तेव्हापासून खोतकर-गोरंट्याल यांच्यातील कटुता अधिक वाढली तर गोरंट्याल यांनी भाजपशी जुळवून घेत नगर परिषदेसाठी केंद्राच्या योजना व निधी पदरात पाडून घेतला. दोन शत्रू एकत्र झाल्याने त्यांना शह देण्यासाठी खोतकर यांनी देखील आता आक्रमक पावित्रा घेतला आहे.

पण श्रेयवाद राजकाराणातील उट्टे काढण्याच्या हातघाईमुळे कधी कधी आपलेच हसू होवून जाते, असाच काहीसा प्रकार अर्जून खोतकर यांच्याबाबतीत घडला आहे. शहरातील निजामकालीन मुर्तीवेसच्या कमानीला काही महिन्यांपुर्वीी वाहन धडकल्याने ती कोसळली होती. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हा स्ता बंद करण्यात आला. नगर परिषदेअंतर्गत या मुर्तीवेसची दुरुस्ती करून रस्ता खुला करावा यासाठी शिवसेनेने अर्जून खोतकर यांच्या नेतृ्त्वाखाली रास्तारोको आंदोलन सुरू केले.

Shivsena Leader Arjun Khotkar, Jalna
शंकरराव, चाकूरकरांच्या तालमीत विलासराव घडले अन् विलासरावांच्या तालमीत मी घडलो..

नगर परिषदेवर काॅंग्रेसची पर्यायाने गोरंट्याल यांची सत्ता असल्याने त्यांना अडचणीत आणण्याचा आणि श्रेय घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न होता, असे बोलले जाते. पण शिवसेनेच्या आंदोलनाचा नेम यावेळी चुकला असेच म्हणावे लागेल. कारण ज्या मागणीसाठी खोतकर आपल्या सैनिकांसह रस्त्यावर उतरले होते, ती मागणी नगर परिषदेने दोन दिवसांपुर्वीच मंजुर केली होती. रास्तारोको सुरु असलेल्या ठिकाणी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाऊन ही माहिती खोतकर व इतर आंदोलकांना दिली. त्यामुळे सगळ्यांचाच हिरमोड झाला. मागणी आधीच मंजुर झाल्यामुळे मग शिवसेनेला हे आंदोलन गुंडाळावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com