
Maharashtra Politics : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कालच्या होळीनंतर आज धूलिवंदन विविध रंगांनी साजरी करताना, विरोधकांना चांगलेच डिवचलं.
राज्यात महायुतीची सत्ता येऊन पाच महिने झाले असून, यात भगवा रंग गडद झाला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्यासह विरोधकांचे रंग सांगताना, जनतेने त्यांच्या रंगाचा बेरंग केला, असा टोला देखील लगावला.
रावसाहेब दानवे म्हणाले, "हिंदू (Hindu) धर्मामध्ये होळीला खूप मोठं महत्त्व आहे. सारे मतभेद विसरून एकत्र येतात. राज्यात महायुतीची सत्ता येऊन पाच महिने पूर्ण झाले असून, राजकारणात कोणता रंग गडद अन् फिका करणं हे राज्यातल्या जनतेच्या हातात आहे." पाच महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या, त्यात जनतेने शिक्कामोर्तब केला की राज्यात फक्त भगवा रंग गडद होऊ शकतो, असेही दानवे यांनी म्हटले.
'काही लोकांनी भगव्यावर हिरवा लावला. लोकाला सांगायला भगवा. पण पोटात हिरवा होता. अशांना लोकांनी नाकारलं. आता त्यांच्या रंगाचा बेरंग झाला. म्हणून या राज्यामध्ये फक्त भगवा रंग गडद होतो आहे. ज्यांनी स्वतःला हिरवा रंग लावून घेतला ते फिके पडले', असाही टोला दानवे (Raosaheb Danve) यांनी विरोधकांना लावला.
विरोधकांना कोणता रंग द्याल, हे सांगताना दानवे यांनी सुरवातीला संजय राऊतांना पूर्णपणाने हिरवा आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंना वरून भगवा आतून हिरवा रंग, असं झालं आहे, असा टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांना भगवा द्यायला आवडेल, असे सांगताना राहुल गांधींना कुठे रंग आहे? फिरंगी माणूस, असा टोला लगावला. जो रंग राहुल गांधीचा, तोच सोनिया गांधींचा. शरद पवार साहेबांनी आतापर्यंत सगळे रंग लावले. भाजप सोबत गेले, ममता बरोबर गेले, शेख अब्दुल्ला बरोबर गेले, मायावती बरोबर गेल्याची आठवण दानवेंनी करून दिली.
अब्दुल सत्तार यांना मागच पदवी दिली आहे. गोल टोपी हिरवा रंग. माझा एक छोटा कार्यकर्ता पक्षांतर करून त्यांच्या विरोधात उभा राहिला. 2200 मताने खेळ हुकला. मला तिथे जायला जर परवानगी असती, तर 50 हजार मतांनी पडले असते, असा दावा दानवे यांनी केला.
'सिल्लोडवाल्यांनो वेळीच सावरा, जगात जागेचे भाव वाढले. पण, सिल्लोडमध्ये वाढले का? कारण त्यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. एक दिवस सिल्लोड अल्पसंख्याक बहुल तालुका होणार आहे. आपल्या नात्यागोत्यातले महाराष्ट्रातील सगळे भरले सगळे गोल टोप्या वाले. लंबी टोपीला महत्त्वच नाही. अब्दुल सत्तार रंग बदलतील का? यावर कोणत्याही पक्षात जाऊ द्या, हिरव्या सोबतच आहे', असा टोला दानवेंनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.