Jalna BJP News : दानवे-लोणीकरांच्या वादात जालन्याचे शहराध्यक्ष पद वेटिंगवर..

Danve-Lonikar : पाच वर्षांपासून दानवे-लोणीकर गटात संघर्ष सुरू आहे. दोघांनीही दोन स्वतंत्र कार्यकारणी जाहीर केल्या होत्या.
Raosaheb Danve-Lonikar News
Raosaheb Danve-Lonikar News Sarkarnama

Marathwada : आठवडाभरापुर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील जिल्हा व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. या निवडींवर त्या त्या जिल्ह्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांचे वर्चस्व दिसून आले. (Jalna BJP News) जालना जिल्ह्यातील नियुक्त्यांवरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यात वाद असल्याने ग्रामीण जिल्हाध्यक्षाची निवड झाली असली तरी अद्याप शहराध्यक्ष पदावर कोणाची नियुक्ती करायची याबाबत एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे हे पद सध्या वेटिंगवर आहे.

Raosaheb Danve-Lonikar News
PM Narendra Modi on Pune Visit : नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला युवा काँग्रेसचा विरोध; बॅनरबाजीतून साधला थेट निशाणा

तसं पाहिलं तर दानवे-लोणीकर हा वाद जिल्ह्याला नवा नाही. युवामोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदावरून देखील यापुर्वी या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. (Raosaheb Danve) संधी मिळेल तेव्हा हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. आता जालना भाजपचा शहराध्यक्ष कोण ? यावरून दोघांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर व जालना हा एक तर परतूर, मंठा घनसावंगी जालना ग्रामीण, अंबड तालुक्यातील शहागड व तीर्थपूरी,गोंदी सर्कल याचा एक अशा प्रकारे दोन कार्यकारिणी निवडीची मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) गटाकडून केली जात आहे.

मात्र आठ दिवसापूर्वी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बद्रीनाथ पठाडे यांची निवड जाहीर झाली. मात्र शहराध्यक्ष पदाचे भिजंत घोंगड कायम आहे. (Jalna) जालना जिल्ह्यात भाजप कार्यकारिणी निवडीवरून गेल्या पाच वर्षांपासून दानवे-लोणीकर गटात संघर्ष सुरू आहे. दोघांनीही दोन स्वतंत्र कार्यकारणी जाहीर केल्या होत्या. दानवे व लोणीकर एकमेकांवर जाहीर टीका करणे टाळत असले तरी त्यांच्यात संवाद नाही. एका व्यासपीठावर येण्याचे देखील हे दोघे कायम टाळत आले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी देखील याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही.

एक विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री तर दुसरा माजी मंत्री असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी जालना शहराध्यक्ष पदाचा तिढा कायम ठेवला आहे. आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बावनकुळे यांनी दोन कार्यकारणी तयार करण्याची लोणीकरांची मागणी मान्य केल्याची चर्चा आहे.

दानवे समर्थक पठाडे यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आधीच वर्णी लागली आहे. त्यामुळे आता शहराध्यक्ष आपल्या गटाचा असावा, असे प्रयत्न लोणीकरांकडून सुरू आहे. तर दानवे यांना शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पदावर आपल्या गटाचा व्यक्ती हवा आहे. या कुरघोडी आणि वर्चस्वाच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com