Kailas Gorantyal joins BJP : 'आईना बनने का हर्जाना तो भरना है मुझे'; शेरोशायरी करत काँग्रेसचा 'कैलास' भाजपच्या वाटेवर...

Congress Kailas Gorantyal Reacts to BJP Rumors in Jalna : जालना इथले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.
Kailas Gorantyal
Kailas GorantyalSarkarnama
Published on
Updated on

Jalna political developments : शिवसेना फुटीनंतर राज्यासह देशात '50 खोके एकदम ओके' ही घोषणा गाजली. या घोषणाचा जनक त्यावेळेचे काँग्रेसचे आमदार आणि आताचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आहे. परंतु आता हेच कैलास गोरंट्याल काँग्रेसवर नाराज असून, भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.

'आईना बनने का हर्जाना तो भरना है मुझे। टूट तो कब का चूका हूँ बस बिखरना है मुझे। कम से कम इतना बता दे मेरी सादा दिली और कितने इम्तिहानों से गुजरना है मुझे?', अशा शेरोशायरीतून कैलास गोरंट्याल यांनी सूचक संकेत दिले.

काँग्रेस (Congress) माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपच्या वाटेकर असल्याच्या चर्चांना शेरोशायरीतून सूचक संकेत दिले. तसेच दोन दिवसांपूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक झाली, त्यात चर्चा देखील झाली आहे. यावर बोलताना, "हज़ारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने राजों कों पडदा रखती है", असा शेर सुनावत काँग्रेसला सूचक इशारा दिला.

विधानसभा निवडणुकीपासून (Election) तुम्ही पक्षावर नाराज होता, त्यावर बोलताना गोरंट्याल म्हणाले, "मी नाराज होतो, असे कसे म्हणता येईल. मी माझी नाराजी बोलून दाखवली आहे". यावर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे उद्या (शनिवारी) भेटण्यासाठी येणार असल्याचा फोन आला होता, असेही गोरंट्याल यांनी सांगितले.

Kailas Gorantyal
Meghalaya News: लग्नापूर्वी HIV चाचणी बंधनकारक? सरकार आणणार लवकरच कायदा

मला पक्षाने फक्त तिकीट दिले, बाकी काही नाही. फक्त तिकीट देऊन वाऱ्यावर सोडले, अशी टीका देखील कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस नेतृत्वावर केली. मी पहिला शेर बोललो आहे. त्याचा अर्थ जाऊन घ्या. ज्याला शेरोशायरी कळते, त्यांना बरोबर कळेल की, मी कुठ जाणार अन् कुठ नाही जाणार, असे सांगून निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे, असे गोरंट्याल यांनी स्पष्ट केले.

Kailas Gorantyal
Sadabhau Khot On Gulabrao Patil : मंत्री गुलाबरावांची भाजप 'विकेट' घेण्याच्या तयारीत; हर्षलच्या आत्महत्याप्रकरणात सदाभाऊंकडून राजीनाम्याची मागणी

खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयातील उद्घाटन कार्यक्रमात कैलास गोरंट्याल यांनी खदखद बोलून दाखवली होती. पाच वर्षे वाट बघणार नाही, असे म्हणत विधानसभा निवडणुकांच्या पराभवानंतरच पक्षांतराचे संकेत देखील कैलास गोरंट्याल यांनी दिले होते. जालन्यामध्ये आपल्याच माणसांनी घात केल्याची राग देखील कैलास गोरंट्याल यांनी बोलून दाखवला.

'आता माघार नाही, लवकरच पेढे भेटणार म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले. विधानसभा निवडणुकीत मी रनिंग आमदार असताना फर्स्ट लॉटमध्ये मला तिकीट दिले नाही, तो उशीर केल्यामुळे रिझल्ट निगेटिव्ह झाला', अशी खंत देखील कैलास गोरंट्याल यांनी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com