Jalna : काॅंग्रेसची भाजप झाली, तर कैलास गोरंट्याल भाजपचे प्रवक्ते ?

दानवेंचा विरोध कमी काय म्हणून आमदार गोरंट्याल यांनी देखील खोतकरांविरुद्ध दंड थोपटले आहेत. दानवेंशी जवळीक साधत गोंरट्याल सध्या त्यांचे कौतुक करतांना थकत नाहीत. (Shivsena)
Mla kailas gorantyal- Arjun khotkar
Mla kailas gorantyal- Arjun khotkarsarkarnama

जालना : जिल्ह्यातील काॅंग्रेसचे अस्तित्व आता राहिलेले नाही, त्या पक्षाची आता भाजप झाली आहे. तर त्यांच्या पक्षाचे आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) हे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे वागत आहेत, असा टोला शिवसेनेचे (Shivsena) माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी लगावला. (Jalna) काॅंग्रेसची भाजप झाली असली तरी भाजपला गाडण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशारा देखील खोतकर यांनी दिला.

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने संपर्क मोहिम राबवली जात आहे. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना अर्जून खोतकर यांनी काॅंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर तोफ डागली. जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना विरुद्ध भाजप-काॅंग्रेस असा संघर्ष सुरू आहे.

राज्याच्या महाविकास आघाडी काॅंग्रेस पक्ष शिवसेनेसोबत असला तरी स्थानिक पातळीवर काॅंग्रेसचे आमदार कैलास गोंरट्याल यांनी भाजपशी जवळीक वाढत शिवसेनेला डिवचण्याचे काम सुरू केले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकर यांच्यातील संघर्ष गेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू आहे. विधानसभेला खोतकर यांचा पराभव झाल्यानंतर तो अधिकच वाढला.

दरम्यान, रामनगर सहकारी साखर कारखाना प्रकरणात ईडीने अर्जून खोतकर यांच्या घरावर तसेच जालना कृषी उत्पन्न बाजार समितीवर धाड टाकत चौकशी केली होती. यामागे दानवेंचा हात असल्याचा आरोप खोतकरांनी केला होता. दानवेंचा विरोध कमी काय म्हणून आमदार गोरंट्याल यांनी देखील खोतकरांविरुद्ध दंड थोपटले आहेत. दानवेंशी जवळीक साधत गोंरट्याल सध्या त्यांचे कौतुक करतांना थकत नाहीत, अशी परिस्थीती आहे.

Mla kailas gorantyal- Arjun khotkar
प्रवीण चव्हाण प्रकरणात नवा ट्विस्ट! गिरीश महाजनांची थेट पोलिसांकडे धाव

तर दुसरीकडे संरपच होण्याची लायकी नसलेले खोतकर खासदार होण्याचे स्वप्न पाहत आहेत, अशी जाहीर टीका गोरंट्याल यांनी एका कार्यक्रमात केली होती. दानवे-गोरंट्याल एका व्यासपीठावर आले की ते खोतकरांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. ईडीच्या कारवाईनंतर देखील गोरंट्याल यांनी तुमची चर्चा देशभरात झाल्याचा टोला खोतकरांना लगावला होता.

मुदखेड ते मनमाड रेल्वे विद्युतीकरणाच्या कार्यक्रमात दानवे-गोरंट्याल-टोपे-कराड एकत्र आले होते. यावेळी देखील गोरंट्याल यांनी खोतकरांना डिवचले होते. तर कराड यांनी गोरंट्याल यांना थेट भाजपमध्ये येण्याची आॅफर दिली होती. एकंदरित जिल्ह्याच्या राजकारणात खोतकर यांच्याविरोधात दानवे-गोरंट्याल ही जोडी एकत्र आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर खोतकर यांनी काॅंग्रेस आणि आमदार गोरंट्याल यांच्यावर टीक करत इशारा देखील दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com