Jalna Maratha Lathi Charge : जालना लाठीचार्जमुळे पंकजा मुंडे नाराज; सरकारकडून केली मोठी अपेक्षा

Pankaja Munde On Maratha Reservation Protest : लाठीहल्ल्याचे बीड जिल्ह्यात पडसाद, शहरे, गावागावांत कडकडीत बंद
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या मराठा आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. पोलिसांच्या या कृतीचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. काही ठिकाणी उत्स्फुर्त बंद पाळण्यात आला, तर कुठे जाळपोळीच्याही घटना घडल्या आहेत. या घटनेला विरोधकांनी सरकारला जबाबदार धरत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर या प्रकरामुळे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे भावूक झाल्या आहे. त्यांनी सरकारकडून या आंदोलनाबाबत मोठी अपेक्षा व्यक्त केली. (Latest Political News)

पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असे जाहीर कार्यक्रमात घोषीत केलेले आहे. आरक्षणासाठी सकारात्मक असलेल्या पंकजा मुंडे जालन्यातील लाठीहल्ल्यामुळे व्यथित झाल्याचे दिसून आहे. त्यांनी सरकारकडून या प्रकाराची निःपक्षपातीणे चौकशीची मागणी केली आहे. "मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी. या प्रकराची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी", अशी मागणी मुंडेंनी केली आहे.

Pankaja Munde
Jalna Maratha Protest : शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; "एकीकडे चर्चा, तर दुसरीकडे लाठीमार.."

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation Protest) मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास बसले होते. दरम्यान, त्यांची प्रकृती ढासळल्याचे सांगून शुक्रवारी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. यात पोलिसांनी हवेत गोळीबारत करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक समाजबांधव जखमी झाले. यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

Pankaja Munde
Jalna Maratha Protest : ‘वंचित’ने जाळला शिंदे, पवार, फडणवीसांचा प्रतीकात्मक पुतळा, उद्याच्या आंदोलनाला पाठिंबा !

जालन्यातील लाठीहल्ल्यामुळे बीड जिल्ह्यातही पडसाद उमटले आहेत. मराठा क्रांती मोर्चाने जिल्हा बंदची हाक दिली आहे. यामुळे बीड शहरासह जिल्ह्यातील गावागावांत सकाळपासून कडकडीत बंद पाळला जात आहे. दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही या प्रकारावरून नाराजी व्यक्त केली आहे. "मराठा आंदोलनकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी, या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी", अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com