Jalna Maratha Protest : शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; "एकीकडे चर्चा, तर दुसरीकडे लाठीमार.."

Sharad Pawar Visit Maratha Reservation Agitation : आंदोलनस्थळी कारण नसताना मोठा फौजफाटा आणला गेला.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Jalna News : जालना जिल्ह्यातील अंबडमधील अंतरवाली सराटी येथे चार दिवसांपासून आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर शुक्रवारी जोरदार लाठीमार झाला. यामुळे राज्यात संतप्त वातावरण निर्माण झाले असून याचे ठिकठिकाणी पडसाद उमटू लागले आहेत. ही घटना निंदनीय असून याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा घाणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने शब्द पाळला नसल्यानेच पुन्हा आंदोलन करण्याची वेळ मराठा समाजावर आल्याचे म्हणत पवारांनी सरकारला घेरले. (Latest Political News)

पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी Sharad Pawar शरद पवारांनी आंदोलनस्थळी जात उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत हा संघर्ष शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचा इशाराही सरकारला दिला आहे. यावेळी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते. या घटनेचा करावा तितका निषेध कमी आहे, असे म्हणत पवारांनी आंदोलनस्थळावर पोलिासांचा मोठा फौजफाटा आणला गेल्याचा आरोपही केला.

Sharad Pawar
Maratha Reservation News : आंदोलकांवरील लाठी हल्ल्याचा सरपंचाने स्वतःची कार जाळून केला निषेध..

शरद पवार म्हणाले, "मराठा समाजावर झालेला अमानुष लाठीचार्ज पाहूनच आलो आहे. यात ८० ते ९० आंदोलक जखमी झाले आहेत. या आंदोलनाशी काही संबंध नसणाऱ्यांनाही झोडपण्यात आले. यानंतर अज्ञात ३५० ते ४०० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येथे कारण नसतानाही पोलिसांचा मोठा फौजफाटा आणला गेला. आता यापुढे शांततेच्या मार्गाने संघर्ष करू," असा इशाराच पवारांनी दिला.

Sharad Pawar
Jalna Maratha Protest : साडेतीनशे आंदोलकांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल..

सरकारने फक्त अश्वासन दिले पण त्याची पूर्तता केली नसल्याचा आरोपही पवारांनी यावेळी केला. ते म्हणाले, "यापूर्वीही मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने आंदोलने केली, मात्र असे प्रकार घडले नाहीत. मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. शब्द पळला नसल्यानेच आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांवर पोलिसांकडून जोरदार लाठीहल्ला केला. एवढेच नाहीतर हवेत गोळीबारही करण्यात आला. एका बाजूला चर्चा सुरू ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला लाठीहल्ला करायचा. आंदोलन दाबण्यासाठी सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न केला", असा घणाघात पवारांनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com