Jalna News : भारतीय जनता पार्टीने आज आपला निवडणुकांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात (BJP Manifesto) युवा, नारीशक्ती, गरीब, शेतकऱ्यांवर, उद्योजकता यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश करण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात (BJP Sankalp Patra loksabha elections 2024) पंतप्रधान मोदींच्या संकल्पांची पूर्तता करण्याचा रोडमॅप सादर केला आहे. दरम्यान या जाहीरनाम्यावर काँग्रेस उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच त्यांनी भाजप उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"ज्याला अहंकार होतो तो नक्कीच हरतो, आम्हाला अहंकार झालेला नाही. त्यांना अहंकार झाला आहे, असं म्हणत जालना लोकसभेचे महाविकास आघाडीकडून असलेले काँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर पुन्हा एकदा टीका केलीय. भाजपची नेहमीची संभ्रम निर्माण करण्याची पद्धत असून मतदार राजा आम्हाला निवडून देत परिवर्तन घडवेल," असा विश्वास काळे यांनी बोलून दाखवलाय. ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जालन्यात आले असता त्यांनी आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पत्रकारांशी संवाद साधला
"गेल्या 50 ते 60 वर्षात काँग्रेस ने विकास आणि सर्व धर्म समभाव या मुद्द्यावर मते मागितलीत, मात्र भाजपला आता जाग आली, असं म्हणत काळे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केलीय. त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकायला लागली असल्याने ते विकासावर बोलायला लागले असल्याची टीका डॉ. कल्याण काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रसिद्ध केलेल्या भाजपाच्या जाहीर नाम्यावर केलीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेला अधिकार आम्ही बजावण्याच काम करत असून मतदारराजा आम्हाला निवडून देईल," असा विश्वास काळे यांनी बोलून दाखवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.