Jalna Maratha Andolan : जालन्यात एसटीच्या सर्व फेऱ्या थांबवल्या ; एसटी महामंडळाचा निर्णय ; प्रवाशांची गैरसोय..

Maratha Andolan : जाळपोळ प्रकरणात ४ कोटी ६० हजार रुपयांचे नुकसान झाले.
Jalna Maratha Andolan
Jalna Maratha Andolan Sarkarnama
Published on
Updated on

Jalna : जालन्याच्या घटनेनंतर राज्यभरात मराठा आरक्षण मागणीच्या हालचाली वाढल्या आहेत. मराठा समाजाने राज्यभर बंदची हाक दिली आहे. मराठा आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील एसटीच्या सर्व फेऱ्या थांबवल्या असल्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. (Latest Marathi News)

आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जनंतर जालना जिल्ह्यात आत्तापर्यत १९ एसटी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे. अनेक बसची तोडफोड करण्यात आली आहे. तीन दिवसापासून एसटी सेवा विस्कळीत सुरु होती, ही सेवा आजपासून पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. राज्यातील विविध ठिकाणाहून मराठवाड्यात येणाऱ्या बस बंद करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी सेवा बंद असल्यानं प्रवाशी आता खासगी वाहतुकीवर अवलंबून आहेत.

Jalna Maratha Andolan
Manoj Jarange News : उपोषणकर्ते मनोज जरांगेंचा मोठा निर्णय ; आजपासून अन्नपाणी त्याग आंदोलन, ‎राज ठाकरे घेणार भेट

जालन्यात एसटी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी ५२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे झालेल्या लाठीमारावरुन राज्यभरात वातावरण तापल्यानंतर एकाच दिवसात जालन्यात १६ एसटी बस जाळण्यात आल्या. तीन एसटी बसची तोडफोड करण्यात आली. या जाळपोळ प्रकरणात ४ कोटी ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे जालना परिवहन विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Jalna Maratha Andolan
Balaji Kinikar News : विकासकामांवरून शिंदे गट-राष्ट्रवादीत वाद रंगला ; उल्हासनगरमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका...

वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत परिवहन नियंत्रकांनी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बदनापूर शहरातही सरकारी वाहनांची जाळपोळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर मध्यवर्ती बस स्थानकातून लांब पडल्यावर धावणाऱ्या एसटी दोन दिवसापासून बंद आहेत. बीड,परभणी, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या मार्गावरील गाड्या तीन दिवसापासून बंद ठेवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. आज लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी, अहमदपूर,चाकूर या भागात बंद असल्याने बस सेवा देखील तात्पुरती बंद आहे. यामुळे या मार्गावर जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांनी खाजगी वाहनाचा आधार घेतला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com