Balaji Kinikar News : विकासकामांवरून शिंदे गट-राष्ट्रवादीत वाद रंगला ; उल्हासनगरमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका...

Maharashtra Politics : आमदार अन् राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकामध्ये खडाजंगी झाली.
Balaji Kinikar
Balaji Kinikar Sarkarnama
Published on
Updated on

Ulhasnagar : उल्हासनगरमध्ये विकासकामांवरून आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. भाटिया चौकातील रस्ते आणि नाल्यावरून सत्तेत असलेले शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद रंगला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भरत गंगोत्री यांनी शिंदे गटातील आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत. हे आरोप किणीकर यांनी फेटाळले आहेत. उल्हासनगर कॅम्प नंबर ४ मधील भाटिया चौक परिसरातील रस्ते आणि नाल्याची पाहणी काही दिवसांपूर्वी आमदार बालाजी किणीकर आणि महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत केली होती. या कामात अनेक त्रुटी आढळल्या आहेत.

Balaji Kinikar
Tushar Doshi News : आंदोलकांना मारहाण करणं पोलीस अधीक्षकाच्या अंगलट ;गृहविभागाने पाठवलं सक्तीच्या रजेवर

सरकारी निधी हा यांनी दिला असून भ्रष्टाचार या मतदार संघाचे आमदार हेच करीत आहेत, असा आरोप भरत गंगोत्री यांनी डॉ. बालाजी किणीकर यांच्यावर केला आहे. यावर आमदार डॉ बालाजी किणीकर यांना विचार असता त्यांनी हे सर्व आरोप फेटावले आहेत. यावर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला .त्यामुळे उल्हासनगरातील राजकीय वातावरण हे चांगलेच तापले आहे.

Balaji Kinikar
Eknath Shinde News : मराठा आरक्षणाचा ज्यांनी गळा घोटला तेच गळा काढायला आले होते.. ; मुख्यमंत्र्यांचा अशोक चव्हाणांवर घणाघात

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात उल्हासनगरचा कॅम्प क्रमांक पाच हा भाग येतो. त्या भागातील भाटिया रस्त्याचे काम एक वर्षापासून रखडले असल्याने दोन दिवसांपूर्वी बालाजी किणीकर यांनी या रस्त्याची पाहणी करून भर रस्त्यात महानगरपालिका अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. भर रस्त्यात महापालिका अधिकाराऱ्यांना आमदारांनी झापले होते. शिवसेना (शिंदे गट) आमदार अन् राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकामध्ये खडाजंगी झाली.

चौकातील रस्त्याच्या शेजारी असलेला काही दिवसांपूर्वी बांधलेला नाला तोडून महानगरपालिकेने या नाल्याचा प्रवाह रस्त्यावर येत असल्याने येथील चौक विद्रुप होत असल्याचा आरोप बालाजी किणीकर यांनी यावेळी केला होता. यावरून भरत गंगोत्री आणि किणीकर यांच्यात वाद झाला आहे. या वादात रस्त्याचा प्रश्न सुटणार का ? असा प्रश्न सामन्य नागरिक विचारत आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com