Manoj Jarange : 'मी मुंबईला आलो, तर परत जाणार नाही'; मनोज जरांगेंची आता मराठा आरक्षणासाठी 'आरपार'ची लढाई

Manoj Jarange Warns BJP Mahayuti Government of Mumbai Protest Over Maratha Reservation : पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाची मुद्दा मार्गी लावण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Maratha protest : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आंतरावली सराटी इथं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

या भेटीत मराठा समाजाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांवर चर्चेबरोबर विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणीबरोबरच जात पडताळणी प्रमाणपत्रांना लागणाऱ्या वेळामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळा, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली. तसंच मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम असल्याचा इशारा दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शिरसाट यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत विधानसभा अधिवेशनात मराठा (Maratha) आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, यावर अधिक जोर दिला. मी 29 ऑगस्टपर्यंत काहीही बोलणार नाही. मी मुंबईला आलो, तर परत जाणार नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.

महायुतीमधील (Mahayuti) मंत्री शिरसाट यांनी आंतरवाली सराटी इथं आले होते. यावेळी जात पडताळणी प्रमाणपत्रावरून दोघांत चर्चा झाली. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही. याबाबत अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जात असल्याचे जरांगे पाटलांनी निदर्शनास आणून दिले.

Manoj Jarange
Ahilyanagar BJP : 'स्थानिक' निवडणुकांमध्ये ताकद दाखणार; भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांनी एकत्रित प्रेस, मित्रपक्षांसह विरोधकांना सूचक इशारा

अधिकारी सरकारला बदनाम करतात

‘सरकारकडून काम होतात. मात्र, अधिकारी चालढकल करत आहे. शिरसाट यांनी अशा अधिकाऱ्यांना निलंबित करावे. काही अधिकारी सामाजिक न्याय विभाग आणि सरकारला बदनाम करत आहे. नोंदी आहेत, तरीही जात पडताळणी साठी वेळ लावत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते', असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

Manoj Jarange
Vijay Rupani: जय प्रकाश नारायण ते मोदींपर्यंत... सर्वांच्या पसंतीस उतरलेले विजय रुपाणी यांचे हे 10 दुर्मिळ फोटो

जात पडताळणी प्रकरणावर सूचना

यावर मंत्री शिरसाट यांनी पडताळणी प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. सामाजिक न्याय विभागाला, मुख्य सचिवांना फोन करून जात पडताळणी प्रमाणपत्र निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.

कोण आपलं आणि कोण परकं

आम्ही राज्यातील प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना आंतरवाली सराटी इथं बोलावणार आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय येणाऱ्या या अधिवेशनात मार्गी लावा. जे खासदार, आमदार, मंत्री आले ते आपले. जे नाही आलेत, त्यावरून मराठा समाजाला कळेल की कोण आपले आणि कोण परके, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com