Jalna Election Result : तुतारी जोरात वाजली, दानवे पिता-पुत्राला दणका; लोणीकरांनी दाखविली ताकद, टोपेंना झटका...

Jalna municipal election results : अंबड नगरपालिकेत भाजप विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होती. या लढतीमध्ये भाजपने नगरपालिका कायम ठेवत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी विजयी झाल्या.
Raosaheb Danve Babanrao Lonikar Sharad Pawar
Raosaheb Danve Babanrao Lonikar Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Local Body Election News : जालना जिल्ह्यातील तीन पैकी दोन नगरपालिकेवर भाजपचे कमळ फुलले आहे. परतूर नगरपरिषदेत भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश जेथलिया यांच्या 30 वर्षांची सत्ता उखडून टाकली. नगराध्यक्ष पदासह सहा नगरसेवक निवडून आणत त्यांनी जेथलिया यांना दणका दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार सुरेश जेथलिया यांना पक्षात घेत स्वतः अजित पवारांनी परतूरमध्ये सभा घेत वातावरण निर्मिती केली, पण लोणीकर यावेळी सगळ्यावर भारी ठरले.

भाजपचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी अंबड नगरपरिषदेची संपूर्ण यंत्रणा प्रभावीपणे राबवत नगराध्यक्ष पदासह दुसऱ्यांदा सत्ता राखली आहे. माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे यांना त्यांनी चांगलाच दणका दिला. भोकरदनची नगर परिषद जिंकण्यात पुन्हा एकदा दानवे-पिता पुत्रांना अपयश आले आहे. काँग्रेसची सत्ता गेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी इथे जोरात वाजली आहे. भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी सत्तेसाठी त्यांना आणखी पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे.

जिल्ह्यातील तीन पैकी दोन नगरपालिकेंवर नगराध्यक्ष निवडून आणत भाजपने आपले वर्चस्व दाखवून दिले. अंबड नगरपालिका ताब्यात ठेवत परतूर नगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपने झेंडा फडकवला आहे. तर काँग्रेसच्या सत्तेला सुरंग लागत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाने भोकरदन नगरपालिकेवर नगराध्यक्ष बसवला आहे.

Raosaheb Danve Babanrao Lonikar Sharad Pawar
Maithili Tambe : विक्रमी मताधिक्य, मैथिली तांबेंसाठी '27' आकडा ठरला लकी; पराभवाचा काढला वचपा...

अंबड नगरपालिकेत भाजप विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होती. या लढतीमध्ये भाजपने नगरपालिका कायम ठेवत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देवयानी कुलकर्णी विजयी झाल्या. तर भाजपचे एकूण 14 नगरसेवक विजयी झाले. इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजेश टोपे यांना केवळ चार नगरसेवक निवडून आणण्यात यश आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि रासपाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत.

नगरसेवक वाढले, सत्तेची हुलकावणी

भोकरदन नगरपालिकेत काँग्रेस, भाजप, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये तिरंगी लढत होती. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी काँग्रेस, भाजपला मात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार समरीन बेग मिर्झा या विजयी झाल्या असून नऊ नगरसेवकही विजयी झाले आहेत. तर भाजपचे आमदार संतोष दानवे यांना येथे आठ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख यांना मात्र येथे फक्त दोन नगरसेवक निवडून आणता आले. शिवाय शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे.

Raosaheb Danve Babanrao Lonikar Sharad Pawar
Local Body Election Result : भाजपला खडबडून जागं करणारा निकाल; शिंदे, अजितदादांना हलक्यात घेणं नडलं?

जेथलियांचे संस्थान खालसा

परतूर नगरपालिकेत 30 वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष झाला आहे. 1995 पासून माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या ताब्यात परतुर नगरपालिका होती. मात्र या निवडणुकीत भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी नगरपालिका ताब्यात घेतली. येथे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियांका  राक्षे विजय झाल्या असून भाजपचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. तर तीस वर्ष नगरपालिकेवर वर्चस्व असणाऱ्या माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांना राष्ट्रवादीकडून केवळ पाच नगरसेवक निवडून आणता आले. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक विजयी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com