Jalna NCP Politics : शरद पवारांनी अभय दिलेल्या सुरेखा लहानेंचे नगराध्यक्षपद अजितदादा सत्तेत येताच गेले..

Bhokardan- Jafrabad Politics : शरद पवार यांनी त्यांच्या घरी केलेल्या चहापानाने मतदारसंघात त्यांचे राजकीय वजन वाढले होते.
Jalna Political News
Jalna Political NewsSarkarnama

Marathwada Political News : जाफराबादच्या नगराध्यक्षा तथा नगरपंचायतीच्या प्रभाग दोनच्या सदस्या सुरेखा संजय लहाने यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली असून तब्बल सहा वर्षे निवडणूक लढविण्यास त्यांना बंदी घालण्यात आली आहे. (NCP Political News) खुद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'अभय 'दिलेल्या सुरेखा लहाने यांचे नगराध्यक्ष पद अजित पवार उपमुख्यमंत्री होताच गेल्याने तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Jalna Political News
PM Modi's Sansad Speech : संसदेच्या कामात आतापर्यंत तब्बल ७५०० लोकप्रतिनिधींनी योगदान दिले; जुन्या संसदेच्या आठवणीत मोदी रममाण

लहाने यांच्यावर उपनगराध्यक्ष दामोधर वैद्य यांच्यासह विविध नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव दाखल केलेला होता. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर दि. २४ ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सुनावनीनंतर उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी शुक्रवारी (ता.१५) नगराध्यक्षा तसेच नगरसेवक म्हणून देखिल लहाने यांना अपात्र केले आहे. (NCP) तसेच नगरसेवक म्हणुन सहा वर्षे निवडणूक लढविण्यास त्यांना अपात्र ठरविले आहे.

जाफराबाद नगर पंचायतीत राष्ट्रवादीचे सात ,काॅग्रेस सहा तर भाजपचे चार असे नगरसेवक असून यातील राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेस व भाजपच्या मिळून चौदा नगरसेवकानी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरेखा लहाने यांच्याविरोधात तक्रार करून कारवाईची शिफारस राज्य सरकारकडे केली होती. (Jalna) या पार्श्वभूमीवर लहानेंनी थेट पुण्यात पवारसाहेबांकडे दाद मागितली होती आणि लगेच शरद पवार जून महिन्यात जाफराबादला येऊन गेले होते.

शरद पवार यांनी त्यांच्या घरी केलेल्या चहापानाने भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघात त्यांचे राजकीय वजन वाढले होते. सुरेखा लहाने यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आदेश पवार यांनी यावेळी दिले होते. लहानेंच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र लहाने यांनी हे आपल्या विरोधातील हे षडयंत्र असल्याचे त्यांनी मोठ्या साहेबांच्या निदर्शनास आणून दिले होते. जाफराबाद येथील नगर पंचायतीमध्ये काँग्रेसचे दोन नगरसेवक फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेखा लहाने नगराध्यक्षा झाल्या होत्या.

त्यानंतर नियमांप्रमाणे सर्वसाधारण सभा न घेणे, खोटा इतिवृत्तांत लिहिणे, नगसेवकांच्या खोट्या सह्या घेत ठराव मंजूर करणे, आर्थिक व धोरणात्मक विषय ऐनवेळी घेणे, वित्तीय मंजुरीची मर्यादा विचारात न घेता जादा किमतीचे प्रस्ताव मंजूर करणे, नियमबाह्य खर्च केल्याचा ठपका ठेवत उपनगराध्यक्ष दामोधर वैद्य यांच्यासह विविध नगरसेवकांनी सुरेखा लहाने यांच्याविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांकडे २७ फेब्रुवारी २०२३ रोजी अविश्वास दाखल केला होता.

Jalna Political News
Parliament Special Session 2023 : स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सात वेळा बोलावले संसदेचे विशेष अधिवेशन, 'काय' होती कारणे?

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. त्यानंतर नगराध्यक्षा लहाने यांच्याविरुध्द विविध अधिनियम अन्वये शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्हीसीद्वारे सुरेखा लहाने यांना अपात्र केले. लहाने यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असे सर्वच नगरसेवक एकवटले होते.

नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी शासनाने अपात्र ठरविल्यानंतर विरोधी नगरसेवकांसह विरोधकांनी जाफराबाद शहरात जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर लहाने यांनी शरद पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लहाने यांचे पद `दादांनी' घालवले, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com