Nitin Gadkari News : धक्कादायक : नितीन गडकरींना दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी

Nitin Gadkari News : धमकीच्या फोननंतर गडकरींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nitin Gadkari News : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज (शनिवारी) साडेअकरा वाजण्याच्या सुमारात हा प्रकार घडला. पोलिस प्रशासन या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहे.

Nitin Gadkari
Satyajit Tambe News : तांबेंचं 'पितळ' उघड ; अजितदादांनी केला थोरातांबाबत मोठा गौप्यस्फोट

नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात दोनवेळा दाऊदच्या नावाने धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे.

Nitin Gadkari
Satyajit Tambe यांचे किती आहे वार्षिक उत्पन्न ? : पावणे दोन कोटींचे सोने अन्.."

गडकरी सध्या नागपुरात एका कार्यक्रमात आहे. या धमकीच्या फोननंतर गडकरींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांचे घर आणि कार्यालयाजवळ सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

एटीएसचे पथक या ठिकाणी आले आहे. कुख्यात गुन्हेगार डॅान दाऊद याच्या नावाने धमकी दिल्यानंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. फोनवर शंभर कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.