Marathwada Political News : (तुषार पाटील) एखाद्या लोकप्रतिनीधीने आपल्या मतदारसंघातील नागरिकांची काळजी वाहने, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, वेळ पडली तर त्यांना आर्थिक पाठबळ देऊन दिलासा देणे अशा अनेक गोष्टी घडत असतात. (MLA Santosh Danve News) कधी त्याचा गवगवा केला जातो, तर कधी निस्वार्थ भावनेने मदत केली जाते. भाजपचे आमदार संतोष दानवे हे दुसऱ्या पठडीतले लोकप्रतिनिधी ठरतात. मतदारसंघातील खऱ्या गरजूंना मदत करणे, मग ती कोणत्याही स्वरूपाची असो ते आघाडीवर असतात.
खोटनाटं सांगून कुणी आपली फसवणूक करू नये, याचीही पुरेपूर काळजी घेत मदत मागणाऱ्याची संपूर्ण माहिती आणि खात्री पटली की, मग ते पूर्णपणे संबंधिताच्या पाठीशी उभे राहतात. (Jalna) असाच अनुभव त्यांच्या मतदारसंघातील उखर्डे कुटुंबाला आला. जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रांजलचा पाठीचा कणा वाकडा असल्याचे निदान झाले होते. (Marathwada) डाॅक्टरांनी उपचारासाठी दहा ते बारा लाखांचा खर्च सांगितल्यामुळे तो आवाक्याच्या बाहेर असल्याने आपली मुलगी आता आयुष्यभर अशीच राहणार हे दुःख घेऊनच उखर्डे कुटुंब प्रांजलला सांभाळत होते.
प्राजंलचे वडील २००५ पासून आमदार संतोष दानवे यांचे कार्यकर्ते म्हणून काम करतात. एकदा त्यांच्याकडे मदत मागावी म्हणून त्यांनी भेट घेतली आणि आशेचा किरण दिसला. आमदार संतोष दानवे (MLA Santosh Danve) यांचे संभाजीनगर, जालना, पुणे व मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी अत्यंत मैत्रीचे व सलोख्याचे संबंध आहेत. याचा फायदा घेत त्यांनी गजानन उखर्डे यांची लेक प्रांजल हिच्या आजारासंदर्भात तज्ज्ञ डाॅक्टरांशी चर्चा केली. पाठीचा मणका जन्मत:च वाकडा असल्यामुळे तिला श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्याचे यातून समजले. त्यामुळे ऑपरेशन करणे अत्यंत अत्यावश्यक होते.
ऑपरेशन केले नाही तर तिच्या जिवाला धोका होऊ शकतो, असे डाॅक्टरांनी सांगितले होते. दानवे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय योजनांमध्ये याचे उपचार होतात का याचीही माहिती घेतली; पण कुठल्याही शासकीय योजनेत हा आजार बसत नसल्यामुळे दानवे यांनी ऑपरेशनसाठी येणारा खर्च आपण स्वतः करणार असल्याचे सांगितले डाॅक्टरांना सांगितले. उखर्डे कुटुंबालाही याची माहिती दिली आणि आॅपरेशन ठरले. गेल्या आठवड्यात १ नोव्हेंबर रोजी ऑपरेशन यशस्विरीत्या पूर्ण झाल्यामुळे प्रांजल हिच्या जिवाचा धोका आता टळला आहे.
तिचा पाठीचा मणका आता पुन्हा सरळ झाला असून, उखर्डे कुटुंबासाठी आमदार दानवे यांनी त्यांना दिलेली ही अनमोल भेट असल्याच्या भावना या कुटुंबाने व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत. मतदारसंघात दौऱ्यावर असताना उखर्डे परिवाराची दानवे यांनी त्यांच्या घरी जाऊन नुकतीच भेट घेतली. सध्या प्रांजल आपल्या घरी विश्रांती घेत आहे. यादरम्यान काही अडचण किंवा त्रास झाला तर तिला पुन्हा मुबंई किंवा संभाजीनगरला हवलणे कुटुंबासाठी अडचणीचे ठरेल म्हणून तिच्या औषधोपचार, ड्रेसिंग व ट्रीटमेंटची संपूर्ण व्यवस्था ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आली आहे. यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणाही आमदार दानवे यांनी उभी करून दिली आहे. दररोज स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने प्रांजल हिच्यावर इंजेक्शन्स व इतर उपचार सुरू आहेत.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.