Maratha Reservation News : बिहारमध्ये होऊ शकते; मग महाराष्ट्रात का नाही ? ...

Maharashtra News : महाराष्ट्रातील भाजपनेही याविषयी अनुकूल भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रातसुद्धा आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी पावले उचलावीत.
Maratha Reservation News
Maratha Reservation NewsSarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan News : महाराष्ट्रात मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. विशेषतः मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसीचे आरक्षण या मागणीने ओबीसी आणि मराठा असा संघर्ष सुरू झाला आहे. (Maratha Reservation News) या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभेत आरक्षण मर्यादा वाढवणारे विधेयक संमत झाले. याच मुद्याकडे काँग्रेसने राज्यातील सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधत बिहारमध्ये होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही ? असा सवाल केला आहे.

Maratha Reservation News
Eknath Khadse News : अँजिओप्लास्टीनंतर माझं हृदय १०० टक्के बंद पडलं...श्वासही थांबला; एकनाथ खडसेंनी सांगितली आपबिती

बिहार राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करा, अशी मागणी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केली आहे. मराठा आरक्षणासह देशभरातील आरक्षणांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेसने अगोदरच घेतली आहे. देशात जातीनिहाय जनगणना करावी आणि आरक्षण मर्यादा शिथिल करावी, असे ठराव काँग्रेस (Congress) कार्य समितीच्या हैद्राबाद व नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत मंजूर झाले आहेत.

आता भारतीय जनता पक्षानेदेखील याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणासह बिहारमधील एकूण आरक्षणाचे प्रमाण ७५ टक्के करण्याचे विधेयक काल तेथील विधानसभेत मंजूर झाले. (Marathwada) बिहारमधील भाजप आमदारांनी त्या विधेयकाला पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील भाजपनेही याविषयी अनुकूल भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रातसुद्धा आरक्षण मर्यादा शिथिल करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली आहे.

बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर केले आहे. विशेष म्हणजे या विधेयकाला भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत.

जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल. देशात जातीय जनगणना करावी आणि आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने अगोदरच घेतली असून, हैद्राबाद व नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत तसे ठरावही मंजूर करण्यात आले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com