Devendra fadnavis Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी सुचविले नाव, मुख्यमंत्र्यांकडून लगेच घोषणा; जगात पोहोचणार 'जालनाई' ब्रँड...

Jalinai, Jalna silk industry, Devendra Fadnavis, Pankaja Munde : सीड, स्टीलनंतर आता सिल्कमुळे जालन्याची ‘ट्रिपल एस’ ओळख; जालना सिल्कला ‘जालनाई’ ब्रँड नेमची मुख्यमंत्री फडणवीसांकडून घोषणा.
Chief Minister Devendra Fadnavis and Guardian Minister Pankaja Munde highlight Jalna's emerging silk economy, with the city's silk identity named “Jalinai”.
Chief Minister Devendra Fadnavis and Guardian Minister Pankaja Munde highlight Jalna's emerging silk economy, with the city's silk identity named “Jalinai”.Sarkarnama
Published on
Updated on

Jalana news : सीड, स्टील आणि आता सिल्क अशी "ट्रिपल एस" म्हणून जालन्याची ओळख होते आहे. सिल्कच्या माध्यमातून एक नवी अर्थव्यवस्था उदयास येत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना सिल्कचे नामकरण करण्याची जबाबदारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सोपवली. याच कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी पैठणची जशी पैठणी तशी जालन्याची 'जालनाई'असे नामकरण केले.त्याला मुख्यमंत्र्यांनीही पसंती दर्शवली.

जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी (ता.14) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या. जालना-सिरसवाडी रोडवरील जागेत उभारलेली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ आता रेशीम विभागाच्या स्वतंत्र इमारतीत स्थानांतरित झाली आहे. सुरुवातीला इमारतीत उपलब्ध सुविधा व रेशीम उद्योगा विषयीची माहिती प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी घेतली.

कॅश क्रॉप म्हणून सोयाबीन आणि कापसाकडे बघितले जाते. त्यामध्ये अपेक्षित उत्पादकता मात्र अजून गाठता आली नाही. त्यामुळे पर्यायी पीक म्हणून तुती पर्यायाने रेशीम कोष उत्पादनाकडे पाहता येईल. अधिकचा पैसा कमविण्याची संधी हे पिक देते आहे. त्यामुळे रेशीम उद्योगात मूल्यवर्धनाची व्यवस्था उभी करावी लागेल. बाजारपेठेचा प्रश्न मिटला आता बाजारात शेतकऱ्यांना योग्य दर कसा मिळेल तसेच प्रक्रियेत लक्ष द्यावे लागेल. पालकमंत्री पंकजा मुंडे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी यामध्ये विशेष लक्ष घालावे,अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

Chief Minister Devendra Fadnavis and Guardian Minister Pankaja Munde highlight Jalna's emerging silk economy, with the city's silk identity named “Jalinai”.
Congress News : भाजपमधील बड्या नेत्याची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी? राहुल गांधींसह खासदाराकडूनही संकेत

जालना सिल्कची ओळख आता " जालनाई "

कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सादरीकरणातून जालना सिल्कला ओळख देण्यासाठी काही ब्रँड नेम सादर केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात ते ठरवण्याची जबाबदारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सोपविली. कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पैठणची पैठणी तसे जालन्याचे सिल्क " जालनाई " अशी सूचना केली. त्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे आता जालन्याचे सिल्क जालनाई नावाने ओळखले जाणार आहे.

Chief Minister Devendra Fadnavis and Guardian Minister Pankaja Munde highlight Jalna's emerging silk economy, with the city's silk identity named “Jalinai”.
Supreme Court news : विद्यार्थी आणि माझ्यातील विषय, तुम्ही लुडबुड करणारे कोण? CJP च्या इशाऱ्यानंतर सरन्यायाधीशांनीही भाजप खासदाराला झापलं

टेक्सटाइल पार्क द्या!

आमदार अर्जुन खोतकर यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत प्रायोगिक तत्वावर जालना बाजार समितीमध्ये रेशीम कोष खरेदी सुरू झाली होती, याचा उल्लेख केला. स्वतंत्र इमारतीचे स्वप्न पूर्ण होत असताना आनंद होत आहे. सिल्क मार्ग अधिक प्रशस्त करण्यासाठी व कोश ते कापड निर्मितीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी जालन्याला टेक्स्टाईल पार्क द्यावा,अशी मागणीही खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com