Congress News : भाजपमधील बड्या नेत्याची काँग्रेसमध्ये होणार घरवापसी? राहुल गांधींसह खासदाराकडूनही संकेत

Amarinder Singh Congress return, Punjab Assembly elections : पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांच्या संभाव्य घरवापसीच्या चर्चेला वेग; राहुल गांधींच्या विधानानंतर काँग्रेसमध्ये नव्या समीकरणांची कुजबुज.
Captain Amarinder Singh Congress return
BJP vs Congress (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Political Strategy : पुढील वर्षभरात होऊ घातलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीआधी राजकीय घडामोडींना आता वेग येऊ लागला आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची आघाडी होण्याची संकेत मिळत आहेत.

तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये भाजपमधील बड्या नेत्याचा पक्षप्रवेश होऊ शकतो, अशीही चर्चा आहे. खरंतर या नेत्याची ही घरवापसी असेल. असे झाल्यास अंतर्गत गटबाजी सुरू असलेल्या काँग्रेसला नवी ऊर्जा मिळू शकते, अशी राजकीय वर्तूळात चर्चा आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची घरवापसी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याला कारण ठरले आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे एक विधान. भाजपमधील सर्वाधिक आवडता नेता कोण, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी अंकल म्हणत अमरिंदर सिंग यांचे नाव घेतले होते. त्यानंतर पंजाबमधील काँग्रेसचे खासदार मनिष तिवारी यांनी दोन दिवसांपूर्वीच सिंग यांच्यासोबतच पाच वर्षांपूर्वीचा म्हणजे मुख्यमंत्री असतानाचा एक फोटो सोशल मीडियात पोस्ट केला होता. या फोटोमध्ये सिंग यांच्यासोबत पक्षाचे सर्व आजी-माजी खासदार दिसत आहेत. त्यामुळेच सिंग यांच्या घरवापसीचे संकेत मिळू लागले आहेत.

अमरिंदर सिंग हे पटियाला राजघराण्यातील आहेत. काँग्रेसमधून राजकीय वाटचाल सुरू झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच २६ फेब्रुवारी २००२ रोजी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. पुढील पाच वर्षे त्यांनी पंजाब राज्याची धुरा सांभाळली.

त्यानंतर १६ मार्च २०१७ रोजी ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदावर विराजमान झाले. मात्र, १९ सप्टेंबर २०२१ रोजी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्याजागी चरणजीत सिंह चन्नी यांची वर्णी लागली होती.

Captain Amarinder Singh Congress return
Shiv Sena case : शिवसेना पक्ष-चिन्हाच्या लढ्यात धक्कादायक ट्विस्ट; ठाकरेंनी केली थेट माजी CJI चंद्रचूड यांच्या 'त्या' निकालाच्या फेरविचाराची मागणी

मुख्यमंत्रि‍पदावरून पायउतार झाल्याने सिंग यांनी काही दिवसांतच काँग्रेसमधून बाहेर पडत वेगळा चूल मांडली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये आपला पक्ष विलीन करत निवडणूक लढली. मात्र, त्यांच्यासह भाजपचाही निवडणूक दारूण पराभव झाला. सिंग यांच्या काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही अनेक नेत्यांनी पक्षासोबतच राहणे पसंत केले. मात्र, असे असले तरी सिंग यांचा पटियालासह पंजाबमधील काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

पंजाबमधील पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. सिंग यांच्यासारखा नेता काँग्रेसमध्ये दाखल झाल्यास पक्षाला निश्चित फायदा होईल. त्यादृष्टीने त्यांना पक्षात पुन्हा आणण्याची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

मात्र, पक्षात आल्यानंतर त्यांच्यावर कुठली जबाबदारी टाकली जाणार याबाबत उत्सुकता आहे. सध्या काँग्रसमध्येच प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चन्नी असे उघडपणे दोन गट पडले आहेत. त्यात सिंग यांची घरवापसी झाल्यास त्रांगडे निर्माण होऊ शकते.

Captain Amarinder Singh Congress return
जन्म दाखल्यासाठी 500 रुपयांची लाच मागितल्याने वाईट वाटले अन् IPS झाल्यावर त्यानेच थेट 1 कोटी मागितले...

दुसरीकडे भाजपनेही शिरोमणी अकाली दल या जुन्या मित्रपक्षासोबत आघाडी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी नुकतीच दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतली आहे.

या भेटीनंतर बादल यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या पक्षाचा लोकसभेत एकच खासदार आहे. मात्र, असे असले तरी या आघाडीने पंजाबमधील निवडणुकीवर निश्चितच परिणाम होईल, असे शक्यता वर्तविली जात आहे.

मागील निवडणुकीत अकाली दल आणि भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढली होती. त्याचा दोन्ही पक्षांना मोठा फटका बसला. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. कदाचित हेही अमरिंदर सिंग यांच्या घरवापसीचे कारण होऊ शकते. सिंग यांनी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यापासूनच अकाली दलाविरोधात आपले राजकारण केले आहे.

मागील एक निवडणूक वगळली तर काँग्रेस विरूध्द अकाली दल असाच सामना रंगायचा. त्यामुळे सिंग यांना अकाली दल आणि भाजप ही आघाडी पटणार नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुढील काही दिवसांत याबाबतच रणनीती स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com