Latur Political News : लोकसभा निवडणुकीत गेलेली पत `जन सन्मान यात्रा` निलंगेकरांना मिळवून देणार का ?

Jan Samman Yatra will bring MLA Sambhaji Patil Nilangekar back the credit : लातूर जिल्ह्यामध्ये भाजप पक्ष, संघटना म्हणून काम करतांना दिसण्यापेक्षा जो तो फक्त आपल्या मतदारसंघाचा विचार करतांना दिसतो आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांना दूर ठेवल्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसला.
MLA Sambhaji Patil Nilangekar
MLA Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
Published on
Updated on

Latur BJP Political News : माजीमंत्री तथा निलंगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काढलेल्या `जन सन्मान यात्रा` चा आज सांयकाळी निलंगा येथे समारोप होणार आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आवर्जून उपस्थितीत राहणार आहेत. निलंगेकर यांनी ही जन सन्मान यात्रा जरी त्यांच्याच मतदारसंघात काढली असली तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने जिल्ह्यात गेलेली पत मिळवण्याचा पक्षाचा या माध्यमातून प्रयत्न होता, अशी चर्चा होत आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेव्हाचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांना निवडून आणण्यात निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचा मोलाचा वाटा होता. विजयातच नाही तर त्यांना उमेदवारी मिळवून देण्यातही निलंगेकर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पण पाच वर्षात मतदासंघाशी, जिल्ह्याशी शृंगारे यांनी संपर्कच ठेवला नाही याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसला.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील महायुती सरकारविरोधात असलेल्या वातावरणाचा फटका तर बसलाच पण पक्षांतर्गत गटबाजी आणि निलंगेकर विरुद्ध इतर असे चित्र संपुर्ण निवडणुक काळात दिसले. परिणामी भाजपच्या लोकसभा विजयाची हॅट्रीक लातूरमध्ये हुकली आणि काँग्रेसला पुन्हा पाय रोवण्याची संधी मिळाली. लोकसभेतील पराभवाने आगामी विधानसभा निवडणुकीचे गणितही जिल्ह्यात बिघडणार आहे.

MLA Sambhaji Patil Nilangekar
MLA Sambhaji Patil Nilangekar : तर मी निवडणुकीतून माघार घेईन..

लातूर जिल्ह्यामध्ये भाजप पक्ष, संघटना म्हणून काम करतांना दिसण्यापेक्षा जो तो फक्त आपल्या मतदारसंघाचा विचार करतांना दिसतो आहे. (Latur) संभाजी पाटील निलंगेकर यांना दूर ठेवल्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसला, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पुन्हा बळ देण्याचा प्रयत्न या यात्रेच्या निमित्ताने बड्या नेत्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीला लीड मिळाल्याने निलंगेकर यांच्यासह स्थानिक नेत्यांची झोप उडाली होती. तेव्हा वेळीच सावध होऊन लोकसभेला झालेले डॅमेज विधानसभेत कंट्रोल करण्याचा प्रयत्न निलंगेकर यांनी आपल्या मतदारसंघात केला आहे.

MLA Sambhaji Patil Nilangekar
BJP Leader Raosaheb Danve News : मोदी म्हणाले, रावसाहेब दानवेजी का काम रुकना नही चाहिए ; अन् झाले हे मोठे काम

बीडमधून भाजपच्या नेत्या व आमदार पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आता समारोपाला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती यातून निलंगेकर यांच्या जन सन्मान यात्रेला बळ देण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. पण जिल्ह्यातील संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी मात्र या यात्रेपासून अंतर राखल्याचे दिसून आले. आज प्रदेशाध्यक्ष समारोपाला येणार असल्याने काही चेहरे दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परंतु निलंगा मतदारंसघातीलच काही जुन्या भाजप नेत्यांना संभाजी पाटील निलंगेकर यांनी दूर ठेवल्याचे आरोप झाले. यात शिरुर अनंतपाळ येथील अॅड. संभाजी पाटील यांनी व्यक्त केलेली नाराजी याची बरीच चर्चा झाली होती. निलंगेकर यांनी मतदारसंघातील शंभर गावांमध्ये जाऊन तीनशे किलोमीटरची पदयात्रा केली. यातून वातावरण निर्मीती देखील झाली, निलंगेकर यांच्यासाठी हे चित्र आशादायक असले तरी लोकसभा निवडणुकीत गेलेली पत ही जन सन्मान यात्रा त्यांना परत मिळवून देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

MLA Sambhaji Patil Nilangekar
Marathwada News : महायुतीत आजबे, धस, धोंडे यांच्यात 'टशन'; आष्टीत शरद पवारांचा मोहरा लावतोय उमेदवारीसाठी 'फिल्डिंग'?

निलंगेकर यांच्या मतदारसंघातील या यात्रेत भाजपच्या काही बड्या नेत्यांनी लावलेली हजेरी पाहता लातूर जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व पुन्हा निलंगेकर यांच्या हातीच येणार असे दिसते. त्यामुळे स्वतःचा मतदारसंघ राखत लातूर जिल्ह्यात भाजपला मोठे यश मिळवून देण्याचे आव्हान संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासमोर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com