Marathwada News : महायुतीत आजबे, धस, धोंडे यांच्यात 'टशन'; आष्टीत शरद पवारांचा मोहरा लावतोय उमेदवारीसाठी 'फिल्डिंग'?

Assembly Election 2024 : विशेष म्हणजे धसांची विधीमंडळ कारकीर्द आपले राजकीय गुरु असलेल्या साहेबराव दरेकर यांच्या पराभवानेच सुरु झाली. सुरेश धस व भीमराव धोंडे या दोघांनी देखील एकमेकांना पराभूत केलेले आहे.
Suresh Dhas Balasaheb Ajbe and Bhimrao Dhonde.jpg
Suresh Dhas Balasaheb Ajbe and Bhimrao Dhonde.jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : धक्कादायक निकालांची परंपरा असलेल्या आष्टी विधानसभा मतदारसंघाची जागा या निवडणुकीत भाजपला की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला असा पेच आहे. त्यात उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे, भाजपचे माजी आमदार सुरेश धस व माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यात रस्सीखेच आहे.

याच मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख चाचपणी करत आहेत. उमेदवारीसाठी त्यांनी पक्षाकडे फिल्डिंग लावली आहे.

आष्टी, पाटोदा व शिरुर कासार या तालुक्यांचा समावेश असलेला आष्टी विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. भीमराव धोंडे यांनी सर्वाधिक चारवेळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 1980, 1985 आणि 1990 असे सलग तीनवेळा आमदार राहीलेले धोंडे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपकडून विधानसभेत पोचले. तर, सुरेश धस देखील या मतदारसंघातून 1999, 2004 व 2009 असे सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले.

विशेष म्हणजे धसांची विधीमंडळ कारकीर्द आपले राजकीय गुरु असलेल्या साहेबराव दरेकर यांच्या पराभवानेच सुरु झाली. सुरेश धस व भीमराव धोंडे या दोघांनी देखील एकमेकांना पराभूत केलेले आहे. दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुरेश धस 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपसोबत आले. 2018 सालची लातूर - धाराशिव - बीड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांना या मतदारसंघातून 69 हजारांचे मताधिक्क्य मिळाले. पण, पुढे पाचच महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर बाळासाहेब आजबे यांनी भाजपच्या भीमराव धोंडे यांचा पराभव केला.

Suresh Dhas Balasaheb Ajbe and Bhimrao Dhonde.jpg
Manoj Jarange News: जरांगे पाटलांंचा 'मास्टर प्लॅन' ठरला; बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम करणार?

दरम्यान, आमदार असलेल्या बाळासाहेब आजबे यांच्यासह भाजपचे सुरेश धस (Suresh Dhas) व भिमराव धोंडे यांचीही विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जामखेडच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धसांना आमदार करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे जागा राष्ट्रवादीची आणि आमदार धस कसे, असा प्रश्‍न उपस्थित झाला. तर, ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा अशी भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनीही परवाच बाळासाहेब आजबेंना साथ देण्याचे आवाहन करत या जागेवरील हक्क कायम असल्याचे दाखविले आहे.

संपर्क, कृषिप्रदर्शनांच्या माध्यमातून भीमराव धोंडे यांचीही तयारी सुरुच आहे. सुरेश धस संघटन कौशल्यात माहीर आहेत तर भिमराव धोंडे यांच्या मागेही मतांचा मोठा गठ्ठा असल्याचे मानले जाते. बाळासाहेब आजबे यांचा सरळ स्वभाव देखील मतदारांना भावतो. त्यामुळे तिघेही ‘एक से बढकर एक’ आहेत. या तिघांची महायुतीत जागा आपल्या पक्षाकडे घेण्याची आणि उमेदवारी मिळविण्याची स्पर्धा सुरु आहे. आता याच मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचेही एन्ट्रीचे प्रयत्न सुरू आहेत.

Suresh Dhas Balasaheb Ajbe and Bhimrao Dhonde.jpg
Yashwant Mane : तुतारी हाती घेणार का? आमदार यशवंत माने म्हणाले, ‘मला शरद पवार गटाकडून ऑफर...’

विविध लग्न समारंभ, मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांनी या मतदार संघात संपर्क वाढविला आहे. मेहबूब शेख राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जातात. पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रत्येक कार्यक्रमात व्यासपीठावर शेख यांना हमखास खुर्ची असते. त्यांची राजकीय वाटचाल तशी सुरेश धस यांचे समर्थक म्हणूनच सुरु झाली. धसांनी राष्ट्रवादीतून भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर धसांना सोडून राष्ट्रवादीत थांबल्याने त्यांना महत्व आले. आक्रमक वक्तृत्व असल्याने पुढे पक्षात त्यांचा मान वाढत राहीला.

शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मेहबूब शेख यांनी घेतलेली भूमिका अजित पवारांना रुचली नाही. अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतल्याने शेख यांचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील महत्व अधिकच वाढले. आता शिवस्वराज्य यात्रा, पक्षाच्या कुठल्याही प्रमुख कार्यक्रमांत ते पुढे असतात.

आष्टी मतदारसंघातील शिरुर कासार तालुक्यातील रहिवाशी असलेले महेबुब शेख या मतदार संघातून पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशिल आहेत. बाळासाहेब आजबे, सुरेश धस, भीमराव धोंडे या स्पर्धा असलेल्या मातब्बरांच्या मतदारसंघात मेहबूब शेख यांना पक्ष निवडणुक रिंगणात एन्ट्री देतो का हे पाहावे लागणार आहे.

Suresh Dhas Balasaheb Ajbe and Bhimrao Dhonde.jpg
Shivsangram Political News: मोठी बातमी! शिवसेना,राष्ट्रवादीनंतर आता शिवसंग्राम फुटली; 'या' बड्या नेत्याची सोडचिठ्ठी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com