बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीत जय भगवान महासंघाने उतरायचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांनाही नव्या राजकीय आव्हानाला सामोरे जावे लागेल.
मुंडे घराण्याच्या गडात नवीन राजकीय शक्तीची एन्ट्री झाल्याने बीडमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
Local Body Election 2025 : बीड जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी थांबता थाबंत नाहीयेत. पक्षातंर्गत विरोधक वाढत असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या बहीण भावांची डोकेदुखी वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जय भगवान महासंघाने उडी घेण्याची घोषणा केली आहे. राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष भडकलेला असताना आता महासंघाच्या निर्णायामुळे मतविभाजनाचा फटका बसू शकतो.
जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांनी केवळ बीडच नाही तर मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या माध्यमातून त्यांनी धनजंय मुंडे, पंकजा मुंडे या बहीण भावांनाच आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षात मनोज जरांगे पाटील सातत्याने पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत होते. तेव्हा बाळासाहेब सानप यांनी या बहीण-भावाची बाजू परखडपणे घेतल्याचे दिसून आले होते.
परंतु आता याच सानप यांनी बीडसह मराठवाड्यात स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका बीडमध्ये पंकजा आणि धनंजय मुंडे यांना मोठ्या प्रमाणात बसू शकतो, असे बोलले जाते. पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे.
ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने असतानाच मराठवाडा विशेषतः बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नुकतीच बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडली.या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जय भगवान महासंघाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर मराठवाड्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. जय भगवान महासंघ आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार आहे. मराठवाड्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्वच ठिकाणी जय भगवान महासंघ उमेदवार देणार आहे. जो कोणी ओबीसींचा विचार करेल असेच नेते आमच्या सोबत राहतील असं म्हणत बाळासाहेब सानप यांनी आता धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांना आव्हानच दिल्याचे बोलले जाते.
1. प्रश्न: जय भगवान महासंघ बीडच्या कोणत्या निवडणुकीत उतरतोय?
उत्तर: जय भगवान महासंघ बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरतो आहे.
2. प्रश्न: या निर्णयामुळे कोणावर परिणाम होणार आहे?
उत्तर: पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकीय प्रभावावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.
3. प्रश्न: जय भगवान महासंघ कोणत्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो?
उत्तर: हा महासंघ बहुजन आणि मराठा समाजातील काही घटकांशी संबंधित असून सामाजिक न्यायासाठी सक्रिय आहे.
4. प्रश्न: बीडमध्ये मुंडे घराण्याचा प्रभाव किती आहे?
उत्तर: बीड जिल्हा हा मुंडे घराण्याचा परंपरागत गड मानला जातो आणि त्यांचा प्रभाव मोठा आहे.
5. प्रश्न: या नव्या समीकरणामुळे बीडमधील निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
उत्तर: जय भगवान महासंघाच्या उतरल्यामुळे मतविभाजनाची शक्यता वाढली असून, निकालांवर मोठा प्रभाव पडू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.