भाजप आमदाराच्या पराभवासाठी जयंत पाटलांनी आताच खूणगाठ मारली..

राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे मराठवाड्यावर लक्ष
जयंत पाटील
जयंत पाटीलsarkarnama
Published on
Updated on

जालना : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत केले असून आज जालना जिल्हयातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. "बदनापूर विधानसभा मतदारसंघात २०२४ ला राष्ट्रवादीचे घड्याळ आणायचे आहे, ही खूणगाठ बांधा", असे आवाहन त्यांनी या बैठकीत केले.

भाजपचे आमदार नारायण कुचे हे या मतदारसंघात सलग दोन वेळ आमदार झाले आहे. राजेश टोपे यांच्या जिल्ह्यातील हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.

जयंत पाटील
एकनाथ शिंदेंनी मानले जयंत पाटील यांचे आभार !

"पक्ष संघटना मजबूत केल्याशिवाय विधानसभेत यश नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करा, बुथ कमिट्यांचे मेळावे घ्या. या सर्व गोष्टी गांभीर्याने घ्यावात'', अशा सूचना पाटील यांनी या वेळी दिल्या. राष्ट्रवादीने सुरू केलेल्या अभिप्राय अभियानातील आलेल्या पत्रांचे वाचन यावेळी मा. जयंत पाटील यांनी केले.

पाटील यांच्या सुरात सूर मिळवून पालकमंत्री राजेश टोपे यांनीही "येणाऱ्या काळात बदनापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सदस्य निवडून आले पाहिजे. त्याकरिता जिद्दीने व एकीने काम करा. तरच स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात येतील व विकास कामांना गती मिळेल", असे आवाहन केले. तालुक्यातील कामांची एकत्रित यादी तयार करा आणि ती माझ्याकडे सोपवावी. पालकमंत्री म्हणून त्या प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न मी करेल, असे टोपे यांनी या वेळी सांगितले.

कोण आहेत नारायण कुचे?

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे कट्टर समर्थक म्हणून नारायण कुचे यांची ओळख आहे. राज्यात २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप युती तुटल्यामुळे बदनापूर मतदारसंघात उमेदवार शोधण्यासाठी भाजपला बरीच पळापळ करावी लागली. शेवटच्या क्षणी दानवे यांनी औरंगाबादमध्ये नगरसेवक असलेल्या कुचे यांना तिकिट दिले आणि निवडून आणले. 14 दिवसांत ते आमदार झाले. 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी आपली जागा कायम राखली. त्या आधी हा मतदारसंघ शिवसेनेकडे होते. राष्ट्रवादीचे अरविंद चव्हाण हे 2014 मध्ये येथून निवडून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com