Jayant Patil On Devendra Fadnavis : 'जेव्हा मेंदू काम करायचं थांबतो, तेव्हा..' ; जयंत पाटलांचा नाव न घेता फडणवीसांवर निशाणा!

Jayant Patil on Mahayuti Goverment : 'आमचं एकच म्हणणं आहे की लाडकी बायको योजना आणा. तिच्यावर का अन्याय?' असा टोलाही महायुती सरकारला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
Jayant Patil Vs Fadnavis
Jayant Patil Vs FadnavisSarkarnama
Published on
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापायला लागलं आहे. प्रत्येक राजकीय पक्षाकडून आपली ताकद वाढवण्यासाठी पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जालन्यात एका कार्यक्रमात पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सत्ताधारी महायुती आणि नामोल्लेक न करता उपमुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला.

पुण्यात झालेल्या भाजपच्या अधिवेशनात फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, विरोधकांना ठोकून काढा फक्त सेल्फ गोल होवू देऊ नका, अशा सूचना केल्या होत्या. यावरून जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिल्याचं दिसत आहे.

जयंत पाटील(Jayant Patil) म्हणाले, 'यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होणार आहे, तुम्ही असं समजू नका की सोपं आहे. कारण, आपण नैतिक अधिष्ठाणावर, विचारांवर आपली निवडणूक लढवत आहोत. मागील दहा वर्षांत महाराष्ट्राची जी अधोगती झाली आहे. त्या मुद्य्यांवर आपण निवडणूक लढवणार आहोत. आणि या सगळ्या मुद्य्यांना उत्तर न देऊ शकणारी लोकं आपल्या समोर आहेत. कोणत्याही मुद्य्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही.'

Jayant Patil Vs Fadnavis
Devendra Fadnavis News : फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र

तसेच, 'उत्तर देत नाहीत, म्हणून मग काल-परवा भाजपचा(BJP) एक मेळावा झाला. त्यात भाजपचे नेते म्हणाले की ठोका. ठोका कधी ज्यावेळी डोकं थांबतं, मेंदू काम करायाचा थांबतो, शब्दांचा वापर संपतो, त्यावेळी माणूस गुद्दा-गुद्दीवर येतो. त्यामुळे समोरच्या लोकांचा हा जो पवित्रा आहे. तो पवित्राच महाराष्ट्राला हे सांगून जातो, की पायाखालची वाळू कधीच सरकलेली आहे. आता यांचं काहीही खरं नाही.' असंही जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil Vs Fadnavis
Raj Thackeray On Ajit Pawar : 'लाडकी बहीण योजना' अन् राज ठाकरेंचा अजितदादा आणि सुप्रिया सुळेंना टोला

याशिवाय, 'आता एवढ्या घोषणा व्हायला लागल्या आहेत, रोज सकाळी एक घोषणा आहे. आता लाडका काका, लाडकी काकी अशा सगळ्या योजना येण्याची शक्यता आहे. आमचं एकच म्हणणं आहे की लाडकी बायको योजना आणा. तिच्यावर का अन्याय? सगळ्याच घरातल्या मुलांना, बाळांना सगळ्यांनाच योजना काढत आहेत. पण मागं किती ताकद आहे, आर्थिक बळ तिजोरीत याचा हिशेब न करता पाहिजे त्या घोषणा आज दुर्दैवाने करणं सुरू आहे.' असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com