Jayant Patil : लाडकी बहीण योजना, सरकारची तिजोरी अन् जयंत पाटलांकडून 'DON'मधील 'त्या' डायलॉगचा दाखला!

Jayant Patil on Ajit Pawar : तिजोरीत भरपूर पैसे असल्याचे ट्विट करून सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत?
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil at Beed News : महानायक अमिताभ बच्चन यांचा डॉन सिनेमा देखील त्यांच्या इतकाच फेमस. 90 च्या दशकात प्रचंड गाजलेल्या सिनेमातील रिकाम्या रिव्हॉल्व्हरच्या सीनचा दाखला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि रिकामी तिजोरी यासाठी दिला आहे. तिजोरीत भरपूर पैसे असल्याचे ट्विट करून सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही जयंत पाटील यांनी टोला लगावला.

'प्रचंड गाजलेल्या सिनेमात अभिनेत्री झीनत अमन हिने डॉन असलेल्या अमिताभ बच्चनला पोलिसांना पकडून देण्यासाठी प्लॅन केलेला असतो. त्यासाठी ती रिव्हॉल्व्हर मधील बुलेट्स काढून ते रिकामे देखील करते. यानंतर पोलिसांनी देखील चोहीकडून घेरलेले असते. आता तू पोलिसांच्या तावडीत सापडणार कारण रिव्हॉल्व्हर रिकामी आहे असे ती अमिताभ यांना म्हणते. पण, रिव्हॉल्व्हर रिकामी आहे, हे फक्त तुला आणि मला माहीत आहे. पोलिसांना माहीत नाही असे म्हणून अमिताभ बच्चन तिच्या तोंडाला रुमाल बांधून तिच्या कानाला रिव्हॉल्व्हर लावून पोलिसांसमोरून सहज निघून जातो.' तसेच आता जाहीर झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आहे असं जयंत पाटील(Jayant Patil) म्हणाले.

Jayant Patil
Kalyan Kale News : कल्याण काळेंनी उमेदवारी घेतली नसती तर माझा नंबर होता; शरद पवार गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितले

योजना जाहीर झाली आणि अर्थ खात्याने त्यावर आक्षेप घेतल्याचे पत्रकारांनी जयंत पाटील यांना बीडमध्ये विचारले. त्यावर ही योजना विचार करून नाही तर सवंग लोकप्रियतेसाठी घेतल्याचे जयंत पाटील म्हणाले. त्यावर अर्थ खात्याचे अनेक आक्षेप आहेत असे वाचण्यात आले आहे. योजनेसाठी सरकारच्या तिजोरीत पैसा पुरेसा नाही. त्यावर पत्रकारांनी सरकारच्या तिजोरीत भरपूर पैसे असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी ट्वीट करून सांगितले यावर त्यांनी 'ट्विट करायला लावले असेल' असा पवारांनाही टोला लगावला. तसेच जसे रिव्हॉल्व्हर मध्ये बुलेट्स नव्हत्या हे जसे झीनत अमान व अमिताभ यांनाच माहीत होते तसे पैसे नाहीत हे देखील त्यांनाच माहीत, असे जयंत पाटील म्हणाले.

कुठलीही योजना लागू करायची तर त्यासाठी महसुली उत्पन्नाचा ताळमेळ लावावा लागतो. जेष्ठांच्या पर्यटन योजनेसाठी सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विभागाच्या योजनांचा पैसा वळविल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

Jayant Patil
MLA Sanjay Shirsat : खैरेंना माझ्या शुभेच्छा, पण त्यांना आधी पक्षातील विरोधकांशी लढावे लागेल..

निष्ठवंतांचा मेळावा आणि विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीनंतर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. पुढारी सोडून गेल्यानंतर ज्याप्रमाणे सामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या जीवावर लोकसभा जिंकल्या तसेच विधानसभा देखील जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माझ्या संपर्कात अनेकजण आहेत, आज बाबाजानी यांचा प्रवेश झाला. सगळे पुढारी गेल्यावर आम्हाला वाटलं आमच्याकडे काय राहतंय? मात्र, जनता आमच्यासोबत आहे हे लक्षात आलंय. तसेच, बावनकुळे(Bawankule) यांच्यासाठी अमित शाह हे सूर्य आहेत, त्यामुळं ते तसेच म्हणणार ते प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं त्यांना बोलावं लागतंय, असा टोला जयंत पाटील यांनी बावनकुळे यांना लगावला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com