MLA Sanjay Shirsat : खैरेंना माझ्या शुभेच्छा, पण त्यांना आधी पक्षातील विरोधकांशी लढावे लागेल..

Shivsena V/S Shivsena Politics : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे गेल्या काही दिवसापासून संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपल्याला निवडणूक लढवायची असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. अर्थात उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर हे सांगायलाही ते विसरत नाहीत.
Chadrakant Khaire-Raju Shinde- Sanjay Shirsat
Chadrakant Khaire-Raju Shinde- Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

MLA Sanjay Shirsat News : गद्दाराला पाडण्यासाठी मला पश्चिम मधून विधानसभा लढवायची आहे. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर मी लढणार, असे सांगत दंड थोपटणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी संयमित भूमिका घेतली. संभाजीनगर आणि मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यात चंद्रकांत खैरे यांचा मोठा वाटा आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. लोकशाहीत कोणाला, कुठूनही लढण्याचा अधिकार आहे.

खैरे यांना पश्चिममधून निवडणूक लढवायची असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. पण ज्यांनी खैरेंना लोकसभेत पाडले, त्यांचे नेतृत्व संपवण्याचे प्रयत्न केले, ते त्यांना उमेदवारी देतील का? निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहे, पण आधी त्यांनी पक्षातील विरोधकांशी लढावे लागेल, असा इशाराही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे गेल्या काही दिवसापासून संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपल्याला निवडणूक लढवायची असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. अर्थात उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर हे सांगायलाही ते विसरत नाहीत. यावरच पश्चिमचे विद्यमान आमदार तथा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना खैरे यांना शुभेच्छा दिल्या.

Chadrakant Khaire-Raju Shinde- Sanjay Shirsat
Shivsena Leader Chandrakant Khaire : लोकसभा निवडणुकीत पैसे नव्हते, गाफील राहिलो ; आता आदेश आला तर विधानसभा लढणार..

खैरे (Chandrakant Khaire) हे शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत, लोकसभा निवडणुकीत एकदा नव्हे तर दोनदा त्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला. हे मी नाही तर त्यांनीच जाहीरपणे सांगितले आहे. पक्षात त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. अशावेळी पक्ष त्यांना विधानसभेची उमेदवारी देईल का? दिली तरी ज्यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांना पाडले ते त्यांना निवडून आणण्यासाठी काम करतील का? हा मला पडलेला प्रश्न आहे.

कोणी कुठून निवडणूक लढवावी याचा लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. माझ्याविरोधात त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांचे स्वागतच आहे. शेवटी मतदार ठरवणार आहे कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाचा पराभव करायचा. त्यामुळे मी खैरे यांच्याविरोधात काही चुकीचं बोलणार नाही. ते ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा आजही सन्मानच करतो.

Chadrakant Khaire-Raju Shinde- Sanjay Shirsat
Sanjay Shirsat : 'शरद पवारांनी हात काढला; तर उबाठाची विधानसभेला दयनीय अवस्था होईल...'

एखाद्या बाहेरच्या पक्षातील माणसाला आणायचे आणि त्याला उमेदवार म्हणून लादायचे हे कोणीही सहन करणार नाही. पक्षात प्रवेश देताना चंद्रकांत खैरे यांना डावलले जात आहे. शिवसेना वाढवणाऱ्या खैरे यांचे नेतृत्वच संपवण्याचा प्रयत्न त्या पक्षातील काही नेते करत आहेत. तेव्हा खैरे यांना आधी पक्षातील अशा लोकांशी लढावे लागेल, त्यानंतरच निवडणूकीतील जय-पराजयाचा फैसला मतदार करतील, असे सांगत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीला हवा देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com