कीर्तन चालू असताना शेख ताजोदिन महाराजांनी देह ठेवला

शेख ताजोदिन महाराज हे मुस्लिम धर्मीय असताना ही ते हिंदू धर्माचे प्रचार प्रसारक म्हणून त्यांची ख्याती होती.
Shaikh Tajoddin Maharaj
Shaikh Tajoddin Maharaj

जालना: जालन्यातील (Jalna) घनसावंगी (Ghansavangi) तालुक्यातील बोधलापुरी (Bodhalapuri) गावातील किर्तनकार शेख ताजोदिन महाराज (Shaikh Tajoddin maharaj) (अंदाजे वय ५७) यांचे निधन झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जामोद गावात कीर्तन चालू असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. दरम्यान त्यांना जामदेहून प्रथमोपचारासाठी तातडीने शनिमांडळ व नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या काळात त्यांची प्राणज्योत मालवली.

Shaikh Tajoddin Maharaj
धक्कादायक: पुराच्या पाण्यात २० प्रवाशांसह वाहून गेली एसटी

शेख ताजोदिन महाराज हे मुस्लिम धर्मीय असताना ही ते हिंदू धर्माचे प्रचार प्रसारक म्हणून त्यांची ख्याती होती. जालना जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणात मानणारा एक वेगळा भक्त वर्ग होता. मात्र काल कीर्तन सुरू असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. शेख ताजोदिन महाराज यांच्या निधनामुळे त्यांच्या भक्त वर्गात एकच दुःखाची लाट कोसळली आहे. त्यांचे पार्थिव आज सकाळी नंदुरबारहून जालन्यातील त्यांच्या मुळ गावी आणण्यात आले.

त्यांनी आयुष्यभर हिंदू धर्माचे पालन केले. हिंदू धर्माचे ते राष्ट्रीय प्रचारक होते. संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा आदी ठिकाणी त्यांनी कीर्तनसेवा दिली होती. त्यांनी हजारों कीर्तने प्रवचने केली. त्यांना मानणारा लाखोंवर चाहता वर्ग आहे. महाराष्ट्रातील हजारो वर्षांच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे ते खरे पाईक होते. त्यांना महाराष्ट्रात किर्तन सम्राट म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद येथे त्यांचे वास्तव्य होते. ते उत्तम गायनाचार्य होते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी मराठी वाड:मय व संत साहित्यावर पीएच.डी.केलेली होती. त्यांनी काही काळ प्राध्यापकाची नोकरी केल्याचे भाविक किरण नांद्रे यांनी सांगितले. नशीबवानच व्यक्तीच ईश्वरभक्तीदरम्यान वैकुंठवासी होतो, असे काही भाविकांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com