Beed APMC Election : जयदत्त क्षीरसागर आक्रमक, आवळ्या-भोपळ्याची मोट म्हणत पुतण्यासह विरोधकांचा समाचार..

Jaydatta Kshirsagar : लोकांचे काम करत असतांना पैसा मागितला नाही. हा बट्टा आणि बाट आपण लावून घेतला नाही.
Beed APMC Election, News
Beed APMC Election, NewsSarkarnama

Marathwada : बाजार समिती निवडणुकीच्या (Beed APMC Election) निमित्ताने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर चांगले आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. आपल्या विरोधात मैदानात असलेले आमदार पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यासह भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांवर त्यांनी जोरदार हल्ला चढवला. आवळ्या भोपळ्याची मोट समोर येते आहे, वेगवेगळे रूप,रंग ढंग आणि मुखवटे घालून. या बेगडांचा मुखवटा काढला तर खरा मुखवटा काय? ते अख्या जिल्ह्याने पाहिले आहे.

Beed APMC Election, News
Umarga Market Committee : विरोधकांचे `कुठे कमी तिथे आम्ही`, धोरण कुणाच्या पथ्यावर ?

कधी वाळू, गुटखा, पत्याचे अड्डे, तोडपाणी अन वसुलीच्या रूपाने ते दिसलयं, अशा शब्दात जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांनी विरोधकांर हल्ला चढवला. मला ही छापता आले असते, टक्केवारी घेता आली असती पण, कधी कुणाचा एक रूपया घेतला नाही, म्हणून हक्काने मत मागायला आलोयं, असेही क्षीरसागर (Sandip Kshirsagar) म्हणाले.

मांजरसुंबा येथे (Beed) बीड बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, माझ्याकडे बांधकाम खातं असतांना, जो बीडमधून जाणारा औरंगाबाद-उस्मानाबाद हा राष्ट्रीय महामार्ग आहे, तो अलाइनमेंट करून, आखून घेतला. वेळेवर व दर्जेदार काम कसे होईल हे पहिले आणि आज हा मार्ग सगळ्यांसाठी सोयीचा ठरतोय.

हा महामार्ग आपण केला, पण या रस्त्याच्या बाजूला जिथे कुसळंही पिकत नव्हते, त्या जमीनीची किंमत आज एक कोटी रुपये एक्कर आहे. पण मी तिथल्या जमीन मालकांकडून एक पैसा घेतला का? मलाही खुप छापता आले असते, आता जी वसुली चालु आहे तसे मलाही १० टक्के काढ, पाच-पाच टक्के सरसगट जमा करून द्या, असे म्हणता आले असते.

पण आयुष्यात कधीही लोकांचे काम करत असतांना पैसा मागितला नाही. हा बट्टा आणि बाट आपण लावून घेतला नाही, म्हणून आम्ही हक्काने मतं मागतो. आपले नाते रक्ताचे नसले तरी विकासाचे आहे, असेही क्षीरसागर म्हणाले. पण सध्या छापणे हा एक कलमी कार्यक्रम सगळ्यांकडून सुरू आहे. पण आपल्याला त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये जायचं का? त्याचे भागीदार व्हायचे का? वर्गणीदार व्हायचं का? याचा आपल्याला ठाम विचार करणे गरजेचे आहे, असे आवाहन करतांनाच त्यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com