Beed Politics : जयदत्त क्षीरसागरांचा आणखी एक पुतण्या राष्ट्रवादीत येणार; दोन भावांमध्ये लढत होण्याची शक्यता

Yogesh Kshirsagar News : कुठल्या पक्षात जायचं, याबाबतचा जयदत्त क्षीरसागर यांचा निर्णय अजूनही ठरलेला नाही. मात्र, त्यांचे पुतणे योगेश क्षीरसागर राज्याच्या राजकारणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Yogesh Kshirsagar
Yogesh KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यातील मातब्बर राजकीय घराणे असलेल्या क्षीरसागर कुटुंबीयांतील शह-कटशहाचे राजकारण आगामी काळात आणखी टोकदार होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेमसधील फुटीनंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे ज्येष्ठ नेते शरद पवारांसोबत राहिले आहेत. त्यांना कटशह देण्यासाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Jaydatta Kshirsagar's nephew Yogesh Kshirsagar will join Ajit Pawar group)

जयदत्त क्षीरसागर यांनी २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यापुढे निभाव लागला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण ताकद पणाला लावून संदीप क्षीरसागर यांना निवडून आणले होते. तो पराभवाचा धक्का सहन न झाल्याने जयदत्त क्षीरसागर हे काही काळ राजकारणापासून अलिप्त होते. मात्र, राज्यात युती सरकार आल्यापासून त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती.

Yogesh Kshirsagar
Flag Hoisting Program : ना अजितदादांची...ना चंद्रकांतदादांची.... पुण्यात दादागिरी राज्यपालांची...

बीडमधील काही कार्यक्रमांना जयदत्त क्षीरसागर यांनी भाजप नेत्यांना आमंत्रित केले होते, त्यामुळे त्यांनी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर ते राजकारणापासून दूर आहेत. कुठल्या पक्षात जायचं, याबाबतचा क्षीरसागर यांचा निर्णय अजूनही ठरलेला नाही. मात्र, त्यांचे पुतणे योगेश क्षीरसागर राज्याच्या राजकारणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Yogesh Kshirsagar
Shinde Group In Trouble: भाजपच्या नव्या भूमिकेमुळे शिंदे गटाला फुटला घाम; लोकसभा कमळ चिन्हावर लढविण्याचा आग्रह

राष्ट्रवादीतील फुटीनंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ देणे पसंत केले होते. त्यामुळे सहाजिकच अजित पवार गटात पोकळी होती. ती भरून काढण्यासाठी अजितदादा गटाकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यातूनच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Yogesh Kshirsagar
Nilesh Rane News: निलेश राणेंचा ठाकरेंना मोठा दणका; कोकणातले चार डझन शिलेदार फोडले, वैभव नाईकांना धक्का !

योगेश क्षीरसागर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आले तर दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहू शकतात, त्यामुळे बीडच्या राजकारणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com