Meghna Bordikar : जिंतूरमध्ये भाजपचा 'प्रताप'; हायव्होल्टेज लढतीत मंत्री मेघना बोर्डिकरांकडून राष्ट्रवादीचा पराभव

Pratap Deshmukh BJP leader won Jintur nagar parishad : जिंतूरमध्ये भाजपचे प्रताप देशमुख चर्चेत; हायव्होल्टेज लढतीत मंत्री मेघना बोर्डिकरांकडून राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव.
Meghana Bordikar News
Meghana Bordikar NewsSarkarnama
Published on
Updated on

जिंतूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला असून 'प्रताप देशमुख' यांच्या विजयानं संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ही लढत केवळ स्थानिक नव्हती, तर राज्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली हायव्होल्टेज निवडणूक ठरली. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची होती आणि त्यांनी जिंतूरमध्ये आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण तापलं होतं. स्थानिक प्रश्नांसोबतच वैयक्तिक टीका, आरोप-प्रत्यारोप यामुळे प्रचार अधिकच रंगला. जिंतूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठ्या अपेक्षा होत्या. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे जाहीर सभा घेत राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार केला. आपल्या भाषणात त्यांनी जिंतूरच्या विकासावर भर देत बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर विकास करू, असं आश्वासन दिलं होतं. यावेळी त्यांनी भाजप आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर टीकाही केली होती.

Meghana Bordikar News
Sawantwadi Nagar Parishad : निलेश राणे यांना मोठा धक्का: नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले विजयी, शिवसेनेचे 7 जागेवर समाधान

अजित पवारांच्या या वक्तव्यांनंतर भाजपकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली. मेघना बोर्डीकर यांनी प्रत्युत्तर देत थेट अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सत्ता कायम बारामतीकडे केंद्रीत राहिली असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितलं की, बारामतीसाठी दहा रुपये खर्च अपेक्षित असतील तर शंभर रुपये निधी दिला जातो. मग हाच न्याय इतर नगरपालिकांना का मिळाला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जिंतूर नगरपालिकेवर भापजची सत्ता, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रताप देशमुख विजयी झाले आहेत. एकूण 25 जागांपैकी भाजपचे 16, राष्ट्रवादी कॉग्रेसचे - 5 काँग्रेस - 4 नगरसेवक पदाचे उमेदवार वियजी झाले आहेत.

आज निकाल स्पष्ट झाले आणि भाजपच्या प्रताप देशमुख यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. या विजयामुळे जिंतूरमध्ये भाजपचा दबदबा अधिक मजबूत झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांपैकी तीन ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत, हे भाजपसाठी मोठं यश मानलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com