Sawantwadi Nagar Parishad : निलेश राणे यांना मोठा धक्का: नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले विजयी, शिवसेनेचे 7 जागेवर समाधान

Maharashtra municipal election results 2025 : नगराध्यक्ष निवडणुकीत श्रद्धा भोसले विजयी झाल्याने निलेश राणेंना मोठा राजकीय धक्का; शिवसेनेला 7 जागांवर समाधान.
Rane family political news Maharashtra
Rane family political news MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Sawantwadi Nagar Parishad Election Result : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून या निकालांनी स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. विशेषतः सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत श्रद्धा भोसले यांच्या विजयामुळे शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले विजयी तर भाजपचे 11, शिवसेना शिंदे गट 7, उद्धव ठाकरे शिवसेना 1 तर काँग्रेसचे 1 नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कणकवली या नगरपंचायतींसाठी आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. तब्बल ७४ टक्के विक्रमी मतदान झाल्याने मतदारांनी कोणाच्या पारड्यात कौल दिला आहे, याबाबत उत्सुकता होती. या निवडणुकीत राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहिला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली, तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून निलेश राणे मैदानात होते.

महायुतीतील सर्वच घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील पक्षांनीही आपापल्या उमेदवारांना उतरवले होते. त्यामुळे या निवडणुकीत थेट आघाड्या न होता, सर्वच पक्षांची खरी ताकद समोर येत असल्याचे चित्र होते.

Rane family political news Maharashtra
Yeola Election Result : भुजबळांनी हॉस्पिटलमधून गड राखला, राजेंद्र लोणारींचा दणदणीत विजय.. दराडे बंधूंना चारली धूळ..

निवडणूक प्रचारादरम्यान निलेश राणे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपकडून पैशांचा गैरवापर होत असल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत राजकीय संस्कृती बिघडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात त्यांनी स्टिंग ऑपरेशनचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र, या तक्रारीवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने न्यायालयात जाण्याचा पर्यायही खुला असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

दरम्यान, सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धा भोसले यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवत मोठी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत उबाठा शिवसेनेच्या सीमा मठकर आघाडीवर असल्या तरी अंतिम निकालात भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली.

Rane family political news Maharashtra
Chikhaldara Nagar Parishad Result : देवेंद्र फडणवीसांचा भाऊ बिनविरोध झालेल्या नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता, नगराध्यक्षपदी दणदणीत विजय!

मालवण पालिकेच्या निकालांकडे पाहिले असता, प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे मंदार केणी आणि दर्शना कासवकर विजयी झाले. प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपचे ललित चव्हाण आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या अनिता गिरकर यांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक तीन आणि चारमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेने वर्चस्व राखले. प्रभाग क्रमांक पाचमध्ये ठाकरे गटाच्या महेंद्र म्हाडगुत आणि भाजपच्या महानंदा खानोलकर यांनी यश मिळवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com