Chief Justice Dr. Dhananjay Chandrachud : काळा कोट आणि गाऊन कर्तव्याची जाणीव करून देतो...

High Court News : न्यायाधीश व वकिलांनी योग्य समन्वयाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा.
Chief Justice Dr. Dhananjay Chandrachud News
Chief Justice Dr. Dhananjay Chandrachud NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad News : न्याय व्यवस्थेतील काळा कोट आणि गाऊन प्रत्येकवेळी तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणिव करून देतो. (High Court News) म्हणूनच घटनाकारांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरुन न्यायाधीश व वकिलांनी योग्य समन्वयाने सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी केले.

Chief Justice Dr. Dhananjay Chandrachud News
Power outage flag hoisting delayed : ऐनवेळी बत्ती गूल; मंत्री, खासदार आमदार सगळेच ताटकळले...

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ (Aurangabad High Court) प्रशानातर्फे आयोजित `कायदेशीर प्रणाली मजबूत करण्याच्या दृष्टीने न्यायाधिश व वकील यांच्यातील सहकार्य कसे वाढवावे`, या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. सुरवातीलाच न्या. चंद्रचूड (Dr. Dhananjay Chandrachud) यांनी मराठीतून मराठवाड्यातील संत परंपरेचा उल्लेख, करत निजामाविरुद्धच्या लढ्यातील स्वातंत्र्यवीरांचा नामोल्लेख केला.

त्यांच्या त्यागाच्या निष्ठेचे फळ आपण स्वातंत्र्य रुपाने चाखतो आहोत, म्हणूनच त्याची जाणिव ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Marathwada) न्यायव्यवस्थेत आता तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. सर्वोच्च न्ययाालयाचे सुमारे ३६ हजार निवाडे ईएसईआर प्रणालीवर मराठीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत, त्याचा लाभ वकील व न्यायाधीशांनी घ्यावा.

वरिष्ठ वकिलांनी वकील व्यवसायात येणाऱ्या तरुण पिढीला वेळोवेळी मार्गदर्शन करावे. तसेच विधि विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे कार्य करून तरुण वकिलांना प्रशिक्षित करावे अशी अपेक्षाही चंद्रचूड यांनी व्यक्त केली. तरुण वकिलांचाही दृष्टिकोन हा व्यापक, वैविध्यपूर्ण व सर्वसमावेशक असावा, असे ते म्हणाले.

यावेळी मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, न्या. दीपांकर दत्ता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय, कर्नाटक उच्च न्ययाायलयाचे मुख्य न्या. प्रसन्ना वराळे, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. संजय व्ही. गंगापूरवाला, औरंगबााद खंडपीठाचे वरिष्ठ न्या. रवींद्र घुगे, राज्याचे महाअधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, बार कौन्सिलचे उपाध्यक्ष उदय वारुंजीकर, खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष नरसिंग जाधव, सचिव राधाकृष्ण इंगोले यांची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com