Kailas Gorantyal : त्या दोघांना समजावून सांग, माझी नाराजी चांगली नाही ; आमदाराने धमकावले

तो सरंपच माझा मित्र आहे, तो खतरनाक असून तुम्हाला कुठेही मारून फेकेल. माहिती अधिकारात माहिती मागवून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. (Mla Kailas Gorantyal)
Mla Kailas Gorantyal News
Mla Kailas Gorantyal NewsSarkarnama

जालना : जिल्ह्या्तील राणीउंचेगाव ग्रामपंचायती मार्फत होणाऱ्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली होती. (Jalna) याची माहिती मिळताच काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी एका मध्यस्थामार्फत तक्रारदारांना धमकावले. (Mla Kailas Gorantyal News)

माहिता अधिकारात माहिती मागवून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. (Congress) शिवाय गावचा सरपंच माझा मित्र आहे आणि तो खतरनाक आहे. तुम्हाला कुठे मारून फेकेल कळणार नाही. माझी नाराजी तुमच्यासाठी नाही, अशा शब्दात गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी धमकावल्याचा आॅडिओ देखील व्हायरल झाला आहे.

संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या धमकी प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आमदार कैलास गोरंट्याल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे राणीउचेगांव येथील ग्रामपंचायत निधीतून कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचेर अंकुश व मंजुषा चव्हाण यांनी उघड केले होते.

तसेच दोषी अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर घनसांवगी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून कारवाई प्रस्तावित आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते देवा चित्राल यांनी संबंधितांना मदत केली होती. याची माहिती मिळताच आमदार गोरंट्याल यांनी देवा चित्राल यांना फोनवरून धमकावले.

तु शिक्षक आहेस या भानगडीत पडू नको, तुझे काम कर. त्या अंकुश चव्हाण, दिनेश उघडे यांनाही समजावून सांग. तो सरंपच माझा मित्र आहे, तो खतरनाक असून तुम्हाला कुठेही मारून फेकेल. माहिती अधिकारात माहिती मागवून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. अशा कामांनी मी नाराज होतो, माझी नाराजी तुमच्यासाठी चांगली नाही, असे गोरट्यांल यांनी चित्राल यास फोनवरून सांगितले.

Mla Kailas Gorantyal News
'मातोश्री'ला वाचविण्यासाठी जाधवांनी स्वतःच्या आईचे नाव द्यावे?..वाईट वाटतं!

दरम्यान, या धमकीनंतर गावातील सरंपचाकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत अंबड पोलीस ठाण्यात आमदार गोरंट्याल यांच्या विरोधात धमकावल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. आशा गाडेकर, अंकुश चव्हाण, दिनकर उघडे, लक्ष्मण बोंबले, भगवान रेगुडे, प्रल्हाद दहिभाते,डाॅ.तौर, सुरेखा पाटील, देवा चत्राल यांच्यावतीने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com