Maharashtra Assembly Election 2024 : पुढील काळात शहराचा सर्वांगीण विकास व भयमुक्त जालन्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. त्यासाठी नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा कायम सोबत राहील, असा विश्वास जालना मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला. रोजगार, महागाई, महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून या पातळीवर महायुती सरकार निष्क्रीय ठरले आहे, अशी टीकाही गोरंट्याल यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress) यांची जालना विधानसभा मतदार संघात जाहीर सभा झाली. जालन्यातील जनतेच्या विश्वासाला खिंडार पाडण्याचे पाप भ्रष्ट युतीने केले आहे. दिवंगत विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीडची पायाभरणी केली गेली.
मात्र देवेंद्र फडणवीसांच्या काळात लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले. निर्सगाने दिलेले लोकांच्या अधिकाराचे पाणी महाविकास आघाडीचे सरकार गावागावात पोहोचवेल, असे आश्वासन पटोले यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना दिले. (Kailas Gorantyal) जालना विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी पंजा मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले.
तर विचारांशी एकनिष्ठ राहून समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला आहे. तसेच पुढील काळात शहराचा सर्वांगीण विकास व भयमुक्त जालन्यासाठी आपला प्रयत्न असणार असल्याचे कैलास गोरंट्याल म्हणाले. त्यासाठी नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा कायम सोबत राहील असा मला विश्वास आहे.
रोजगार, महागाई, महिला सुरक्षेचा प्रश्न असे असंख्य प्रश्न राज्यात कायम आहेत. निष्क्रिय महायुती सरकारमुळे हे प्रश्न अजूनही तसेच आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन गोरंट्याल यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.