Dr. Kalyan Kale News: हर घर नल, पण जल कुठंय.. काळेंची मोदी सरकारवर टीका...

Jalna Lok Sabha Election 2024: दोन वेळा मंत्रिपद मिळाले तरी लोकांना प्यायला पाणी नाही. केंद्र सरकारची हर घर नल से जल ही योजना आहे. पण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली असती, तर पाणी पाणी म्हणत भटकंती करण्याची वेळ आली नसती...
Dr. Kalyan Kale News
Dr. Kalyan Kale NewsSarkarnama

Jalna News: केंद्रातील मोदी सरकार (Narendra Modi) गोरगरिबांसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असल्याचे जाहीर सभांमधून सांगत आहेत. त्यांचे नेते मोठ मोठे आकडे सांगून देशाचा विकास झाल्याचा दावा करीत आहेत. हर घर नल, हर घर जल ही त्यापैकीच एक योजना. हर घर नल आहे, पण जल कुठंय, असा सवाल जालना लोकसभा मतदारसंघाचे (jalna loksabha Election 2024) महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी केला.

या योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या झाली असती तर आज लोकांना आणि शेतातील जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नसते, अशी टीका करतानाच काळे (Dr. Kalyan Kale News) यांनी आपल्या मतदारसंघातील पाणीटंचाईचे वास्तव दर्शवणारे छायाचित्र दाखवले. विरोधकांवर हल्ला चढवताना तुमच्या गोठ्यात गुरांना प्यायला पाणी आहे, पण लोकांना नाही, असा हल्ला काळे यांनी चढवला.

Dr. Kalyan Kale News
Raosaheb Danve Watched The Kerala Story: चारशे महिलांसोबत दानवेंनी पाहिला `द केरळा स्टोरी`, सेल्फीही दिल्या..

लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापू लागला आहे. एकीकडे चाळीस अंशाच्या वर गेलेला पार तर विरोधकांवर तुटून पडताना उमेदवारांचा वाढलेला पारा यामुळे निवडणुकीचे वातावरण गरम झाले आहे. जालना लोकसभा मतदारसंघात महायुतीचे रावसाहेब दानवे विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे यांच्यात थेट लढत होत आहे.

2009 मध्ये रावसाहेब दानवे यांना कडवी झुंज देऊन केवळ आठ हजार मतांनी पराभूत झालेल्या कल्याण काळे यांना काँग्रेसने पंधरा वर्षांनी पुन्हा मैदानात उतरवले आहे. काळे यांच्या उमेदवारीने जालन्याच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. काळे यांनी प्रचार सभांमधून महायुतीवर टीकेची झोड उठवताना केंद्र सरकारच्या योजनांचीही चिरफाड केली.

Dr. Kalyan Kale News
Modi Malshiras Visit: साखर कारखान्यांच्या आयकराचा प्रश्नही पवारांनी सोडवला नाही; मोदींचे टीकास्त्र

जालना लोकसभा मतदारसंघात पंचवीस वर्षे एकाच पक्षाचा खासदार, दोन वेळा मंत्रिपद मिळाले तरी लोकांना प्यायला पाणी नाही. केंद्र सरकारची हर घर नल से जल ही योजना आहे. पण या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली असती तर, आज जालन्याच्या मतदारांवर पाणी पाणी म्हणत भटकंती करण्याची वेळ आली नसती.

पंचवीस वर्षे खासदाराने तोंडाला पाने पुसली आहेत. पंचवीसपैकी दहा वर्षे केंद्रात मंत्रिपद होते, पण त्यांनी ना मंत्रिपदाला न्याय दिला आहे ना नागरिकांना. मतदारसंघात पाण्याचे किती दुर्भिक्ष आहे हे सोयगाव तालुक्यातील लेणापूर गावात गेलो तेव्हा दिसून आले. तुमच्या गोठ्यातील गुरांना प्यायला पाणी आहे, पण मतदारसंघातील लोकांना नाही. ही केविलवाणी अवस्था आहे जालन्याची, अशा शब्दांत काळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

Edited by: Mangesh Mahale

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com