Kalyan Kale Lok Sabha News : दानवेंच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे मैदानात?

Jalna Loksabha Election Constituency 2024 : दानवेंच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे लोकसभेच्या मैदानात? उमेदवारी जाहीर होण्याआधीच प्रचाराचा नारळ फोडला. भोकरदनमधूनच प्रचाराला सुरुवात केली आहे.
Dr Kalyan Kale, Raosaheb Danve
Dr Kalyan Kale, Raosaheb Danve Sarkarnama

Jalna Loksabha Constituency : जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपने सलग सहाव्यांदा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे काँग्रेसकडून (Congress) दानवेंच्या विरोधात कोण लढणार याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी 2009 च्या निवडणुकीत दानवेंना घाम फोडणाऱ्या माजी आमदार कल्याण काळे (MLA Kalyan Kale) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. उमेदवारी जाहीर झाली नसली तरी काळे यांनी दानवेंच्या भोकरदनमधूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. latest News Marathwada Politics

डॉ. कल्याण काळे यांनी दानवे यांच्या बालेकिल्ल्यात प्रचाराचा नारळ फोडला असून, त्यांना काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत दिल्याचे बोलले जाते. काळे यांनी 2009 मध्ये रावसाहेब दानवे यांना कडवी झुंज दिली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्ह्यात असलेला संताप मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसने रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या विरोधात पुन्हा जुन्याच उमेदवाराला मैदानात उतरवले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उर्वरित उमेदवारांची यादी लवकर जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचे निवासस्थान असलेल्या भोकरदन इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला. भोकरदन (Bhokardan) येथे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवडणूक पूर्व नियोजन बैठक पार पडली. latest News Maharashtra Politics

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr Kalyan Kale, Raosaheb Danve
Chhatrapti Sambhajinagar News : भुमरेंच्या मुंबईच्या बंगल्यात संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार ठरला?

यानंतर त्यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघातील (Bhokardan Vidhansabha Constituency) जाफराबाद येथेदेखील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे (Kalyan kale) यांनी भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणजे रोखे आणि खोके सरकार असून, जनावरे ज्याप्रमाणे पळवली जातात त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी (BJP) इतर पक्षांचे आमदार आणि उमेदवार पळवून नेण्याचे काम करीत असल्याची खरमरीत टीका या वेळी केली.

दानवे पिता-पुत्रांवरही काळे यांनी केली टीका

वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून महाविकास आघाडीचा (MVA) उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. कल्याण काळेंसारखा विरोधक, मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा, वंचितची भूमिका व दानवेंच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बनसी त्याचा फायदा उचलत काँग्रेसचे काळे 2009 मध्ये हुकलेला विजय 2024 मध्ये साकारतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.Latest Political News

महाविकास आघाडीतील (MVA) घटक पक्ष कल्याण काळे यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कशाप्रकारे साथ देतात, यावर कल्याण काळे यांचा विजय अवलंबून असणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवें, बबलू चौधरी, शिवसेनेचे मनीष श्रीवास्तव, सुधाकर दानवे, वरुण पाथ्रीकर ,संजय लहाने यांची उपस्थिती होती. Latest Marathi News

R

Dr Kalyan Kale, Raosaheb Danve
Pankaja Munde: माझं तिकीट राज्यानं नव्हे देशानं ठरवलं; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com