karnatak Issue : मराठी भाषिक गावे केंद्रशासित करण्यासाठी पुर्नविचार याचिका दाखल करा..

Ambadas Danve : कर्नाटक ज्यापद्धतीने दिल्लीत जाऊन कायदेशीर बाबी, भेटीगाठी करत आहे, त्यापेक्षा दुप्पट गतीने हा प्रश्न हाताळावा
Opposition Leader Ambadas Danve news, Aurangabad
Opposition Leader Ambadas Danve news, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Ambadas Danve : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात विधानपरिषदेत मांडण्यात आलेल्या ठरावाबद्दल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारसह सर्वच पाठींबा देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. (Supreme Court)सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा येथील निकाल पूर्णपणे लागेपर्यंत मराठी भाषकांची गावे केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी सरकारने पुर्नविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

Opposition Leader Ambadas Danve news, Aurangabad
Winter Session : तुम्ही अजून सहकार खात्यात रुळला नाहीत ; पवारांनी पुन्हा सावेंना सुनावले..

तसेच कर्नाटकचे (Karnatak) मुख्यमंत्री यांनी केलेल्या ट्विट प्रकरणी, ज्यांनी ट्विट केले त्या व्यक्ती बाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे उपमुख्यमंत्री यांनी म्हटले होते. त्याबाबत गुन्हा दाखल झाला का? याची माहिती मागितली. कर्नाटक सरकार ज्यापद्धतीने दिल्लीत जाऊन कायदेशीर बाबी हाताळत आहे, केंद्र सरकारशी भेटीगाठी करत आहे, त्यापेक्षा दुप्पट गतीने (Maharashtra) महाराष्ट्र सरकारने हा प्रश्न हाताळावा, अशी सूचनाही दानवे यांनी केली.

तसेच त्यांनी मांडलेल्या या सूचना याचिकेत समाविष्ट कराव्यात, अशी मागणी केली. तसेच या ठरावाला पाठींबा दिला. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात एक जिनसी पध्दतीने कर्नाटकच्या दादागिरीला महाराष्ट्र सरकारकडून कशाप्रकारे उत्तर दिले जाईल याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील दानवे यांनी केली.

दरम्यान, अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापुर्वी दानवे यांच्या नेतृत्वाखाली गायरान जमीनीच्या दीडशे कोटींच्या घोटाळा प्रकरणी विरोधकांनी भजन आंदोलन केले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com